जागतिक महिला दिन (International Women’s Day 2022) म्हणजे 'ती'चा जागर करण्याचा दिवस. अहोरात्र आपल्या कुटुंबाला, मुलाबाळांना सांभाळत असताना स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी झगडणाऱ्या तिला लोकमत परिवाराकडून मानाचा मुजरा. याच महिला दिनाचे औचित्य साधत लोकमत सखीतर्फे (Lokmat Sakhi) #BeTheChange हा खास उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये दिवसभरात प्रत्येक तासाला विशिष्ट क्षेत्रातील नामवंत महिला आपल्याशी संवाद साधणार आहेत. यानिमित्ताने लहान मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंतचे प्रश्न, विविध क्षेत्रात महिलांनी घेतलेली भरारी आणि तिचा लढा अशा सगळ्याचा आढावा घेतला जाणार आहे.
लोकमत आणि लोकमत सखी अशा दोन्ही फेसबुक पेजवरून हे लाईव्ह आपल्याला आज दिवसभर ऐकता येणार आहेत. याबरोबरच लोकमतच्या यु-ट्यूब चॅनेलवरही या मुलाखती ऐकता येणार आहेत. सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणाऱ्या ‘ती’च्या जागरात आपण सगळ्यांनी सहभागी होऊया आणि तिच्या जिद्दीची, लढ्याची गोष्ट ऐकूया. कदाचित ही गोष्ट आपल्याला नवीन माहिती देणारी, प्रेरणा देणारी ठरू शकेल. तेव्हा लोकमतच्या #BeTheChange या उपक्रमात नक्की सहभागी व्हा आणि आजचा महिला दिन तुम्हीही स्पेशल बनवा.
लाईव्हमध्ये सहभागी होणारे तज्ज्ञ आणि त्यांचे विषय
१. सकाळी १० - विषय : वयात येणाऱ्या मुलींच्या सिक्रेट जगात.डॉ. शिल्पा चिटणीस जोशी, स्त्रीरोगतज्ज्ञ वंध्यत्वतज्ज्ञ
२. सकाळी ११ - विषय- ' गोष्ट मनाच्या तुरुंगाची 'स्वाती साठे, विदर्भ कारागृहात उपमहानिरीक्षक
३. दुपारी १२ - विषय - स्वयंपाकघर, फेसबुक आणि पोषण.भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकार
४. दुपारी १ - विषय - ' आपल्या घरात मोबाईलवर तसलं काही...' मुक्ता चैतन्य, समाजमाध्यम अभ्यासक
५. दुपारी २ - विषय - सुख दुःखाची 'सिरीअल' गोष्ट.अनिता दाते, अभिनेत्री
६. दुपारी ३ - विषय - ' त्या ' चार दिवसांबद्दल...नम्रता भिंगार्डे, पानी फाऊंडेशन
७. दुपारी ४ - विषय - ' यूट्यूबर आजी ' सोबत गप्पा.. सुमन धामणे, अहमदनगर
८. सायंकाळी ५ - विषय - चिडलेल्या आईच्या ऑनलाईन भिरभिऱ्या मुलांबद्दल...श्रुती पानसे, मेंदूअभ्यास तज्ञ
९. सायंकाळी ६ - विषय - कायद्यावर बोट, कामाचं बोला.दिपाली गोगटे, कार्यकर्ती, वयम् सामाजिक संस्था
१०. सायंकाळी ७ - विषय - 'कॅन्सर जगणं शिकवतो तेव्हा...'वंदना अत्रे, पत्रकार