Happy International Women's Day: तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही; राज ठाकरेंचा महिलांना खास संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 09:45 AM2021-03-08T09:45:04+5:302021-03-08T09:48:40+5:30
Raj Thackeray On International Women's Day: तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबई: जगभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन (Internation Women's Day) म्हणून साजरा केला जातो. याचपार्श्वभूमीवर मनसेप्रमखराज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सर्व महिलांना खास संदेशाच्या माध्यामाने जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
राज ठाकरेRaj Thackeray ट्विटरद्वारे म्हणाले की, ८ मार्च, आज जागतिक महिला दिन. मुळात महिला दिन Women's Day हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही. आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, "बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील" त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी ३६५ दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या जगतनियंत्याचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिज, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मी मागे एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून जे बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो; तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, राजकारणात किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझं आवर्जून सांगणं आहे तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही, तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा, तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
#महिलादिन#जागतिक_महिला_दिन#WomensDay#womenempowermentpic.twitter.com/vB5pyghObz
— Raj Thackeray (@RajThackeray) March 8, 2021
दरम्यान, जागतिक महिला दिनानिमित्त जगभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच महिलांचा सन्मान करुन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम होणार नाहीत.
महिला दिन साजरा करण्याची सुरुवात २८ फेब्रुवारी १९०९ साली झाली होती. त्यानंतर १९१०च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत एक ठराव मांडण्यात आला आणि त्या सुचनेनुसार ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. समाजातील महिलांना समान अधिकार देणे आणि सन्मान करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.