Join us

International Yoga Day 2018 : मुंबईत योगदिन झोकात! मुख्यमंत्र्यांसह अनेकांचा सहभाग, 'आयएनएस विराट'वर विराट योगा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 9:21 AM

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत अनके ठिकाणी योगासने सादर केली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी योग केला. तसेच, आयएनएस विराटवर नौदलाच्या जवानांनी सुद्धा योग केला. यावेळी मोठ्या संख्येने जवानांनी हजेरी लावली.

मुंबई: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत अनके ठिकाणी योगासने सादर केली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी योग केला. तसेच, आयएनएस विराटवर नौदलाच्या जवानांनी सुद्धा योग केला.

गेल्या 30 वर्षे भारतीय नौदलाची शक्तीस्थळ म्हणून मिरवणा-या आयएनएस विराट विमानवाहू युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांनी योग केला. यावेळी मोठ्या संख्येने जवानांनी हजेरी लावली. गेल्या वर्षी आयएनएस विराट सेवेतून निवृत्त झाली आहे. 

मुंबईमध्ये योग दिनानिमित्त आशिष शेलार यांनी योग शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, बाबूल सुप्रियो, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि मुंबई मनपा आयुक्त अजोय मेहता सहभागी झाले होते.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी जागतिक योग दिनानिमित्त राजभवन येथे समुद्रकिनारी सूर्योदयाच्या साक्षीने योगासने केली. राजभवन भेटीसाठी आलेल्या योगप्रेमी नागरिकांसोबत राज्यपालांनी योगासने केली आणि उपस्थितांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये योग व्यायाम प्रकारातील प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. 44 ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत योगासने करण्यात आली. 

 

टॅग्स :आंतरराष्ट्रीय योग दिनमुंबई