International Yoga Day 2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा योग, राजभवनात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 11:09 AM2021-06-21T11:09:13+5:302021-06-21T11:09:42+5:30

International Yoga Day 2021: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांच्या आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासह इतर खबरदारी घेण्यात आली.

International Yoga Day 2021: Governor Bhagat Singh Koshyari's Yoga, International Yoga Day celebrated at Raj Bhavan | International Yoga Day 2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा योग, राजभवनात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

International Yoga Day 2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा योग, राजभवनात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Next

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Yoga Day) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे आयोजित योगवर्गात सहभागी होत योगासने केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील योगवर्गात सहभाग घेतला.

योग इन्स्टिट्युटच्या जनसंवाद प्रमुख मीना नल्ला, मुख्य प्रशिक्षिका पूजा हेलिवाल तसेच प्रशिक्षक अमर पांधी यांनी यावेळी राज्यपालांसह उपस्थितांना योगासने सांगितली.

सांताक्रूझ, मुंबई येथील ‘द योग इन्स्टिट्युट’ या संस्थेच्या अध्यक्षा हंसा जयदेवा यांच्या मार्गदर्शनाखाली योगवर्गाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांच्या आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासह इतर खबरदारी घेण्यात आली.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचं काय आहे महत्त्व? 
आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे. दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. हा दिवस वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे आणि योग देखील एखाद्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य देखील प्रदान करतो. 21 सप्टेंबर 2015 रोजी प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 27 सप्टेंबर 2014 रोजी पुढाकार घेतला होता. त्यानंतर 21 जून हा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून घोषित करण्यात आला. 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या 177 सदस्यांनी 21 जून रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. 

Web Title: International Yoga Day 2021: Governor Bhagat Singh Koshyari's Yoga, International Yoga Day celebrated at Raj Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.