मुंबईत आंतरराष्ट्रीय योग महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:47 AM2017-08-15T01:47:44+5:302017-08-15T01:47:46+5:30

मनुष्य हा समूहाने जगणारा प्राणी अशी आपली सर्वांची संकल्पना आहे. परंतु बदलत्या जीवन पद्धतीमुळे, अनैसर्गिक काम करण्याच्या पद्धतीमुळे माणूस हा स्वत:चासुद्धा नीट विचार करताना दिसत नाही.

International Yoga Festival in Mumbai | मुंबईत आंतरराष्ट्रीय योग महोत्सव

मुंबईत आंतरराष्ट्रीय योग महोत्सव

Next

मुंबई : मनुष्य हा समूहाने जगणारा प्राणी अशी आपली सर्वांची संकल्पना आहे. परंतु बदलत्या जीवन पद्धतीमुळे, अनैसर्गिक काम करण्याच्या पद्धतीमुळे माणूस हा स्वत:चासुद्धा नीट विचार करताना दिसत नाही. अति काम, प्रवास, खाण्या-पिण्याच्या विविध वेळा, जागरण, असूया, खºया प्रेमाचा अभाव आणि सतत वाढणाºया अपेक्षा यामुळे तो खूप त्रस्त झाला आहे. यातून मानसिक आणि शारीरिक शांतता मिळण्यासाठी मुंबईत पहिल्या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाचे आयोजन १८ ते २० आॅगस्टदरम्यान केले आहे.
इन्स्टिट्यूट आॅफ योगा पुणे, योग संजीवनी मुंबई आणि ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या योग महोत्सवात ‘योग’ विषयाबरोबर आयुर्वेद, अध्यात्म, मंत्र, यज्ञ, वास्तू, प्राणायाम आणि ध्यान याचे विविध प्रकार, कर्मयोग, अष्टवक्र गीता, शक्तिपात, देह व वेदना, वायू या विषयांवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत. पण योगामधील विविध विषयांचे प्रात्यक्षिक शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकविले जाणार असून, त्याचा सराव उपस्थित साधकांकडून करून घेतला जाणार आहे.
भारतीय रूढी, परंपरा, योग परंपरा, वेद उपनिषद ज्ञानाची त्याला उपज आहे. परंतु त्यामध्ये असणारी क्लिष्टता त्याला भंडावून सोडते हे सत्य आहे. मनुष्याला आपले सर्व ज्ञान, त्याला समजेल अशा स्वरूपात आणि आवाक्यात हवे आहे. हाच विचार करून या योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या योग महोत्सवामध्ये साध्वी आभा सरस्वती (परमार्थ निकेतन, हरिद्वार) या मंत्रयोग, आचार्य मुकुंद भोळे (प्राणायाम), पद्मश्री डॉ. शरद हर्डीकर (सांधेदुखी आणि योग), हंसाजी जयदेव (योग शिक्षकाचे व्यक्तिविशेष), झेनोबिया खोडाइ जी, झुबीन मुल्ला, राधाचरण चौधरी, शम्मी गुप्ता, मेघा धारगळकर, विक्रांत उरुणकर, हरिभाऊ क्षीरसागर, आशिष पांड्ये, अजित भिडे, विक्रांत उरुंणकर, कुंदा काणे (यज्ञ), अजित भिडे, नितीन पत्की, योगाचार्य विदुला शेंडे, विद्यावाचस्पती रामचंद्र देखणे (ज्ञानेश्वरी), ज्येष्ठ संस्कृत पंडित वसंत गाडगीळ (योग आणि आयुर्वेदसाठी संस्कृतचे महत्त्व), डॉ. केशव क्षीरसागर, आचार्य काशिनाथ मेत्री (योगोपचार), आचार्य श्रीकांत क्षीरसागर या व्यक्ती यज्ञ, ताणतणाव, व्याधीनुरूप योगोपचार, योग शिक्षकाचे प्रावीण्य, मंत्र, शवासन, प्राणायाम, ज्ञानेश्वरी, संस्कृत भाषा आणि योग व आयुर्वेद, मधुमेह आणि योगोपचार, शक्तिपात, संजीवन प्राणायाम, अध्यात्म आणि व्यवस्थापन हे विषय मांडणार आहेत. सदर महोत्सव हा निवासी स्वरूपामध्ये आहे. त्यासाठी मर्यादित जागा असून, त्यास नाममात्र शुल्क आहे. (यामध्ये दोन दिवस निवास व्यवस्था, नाश्ता आणि दोन वेळेस जेवणाचा समावेश आहे.) त्यासाठी ९०४९२९६५३९ येथे संपर्क साधावा आणि ६६६.े४ेुं्र८ङ्मॅांी२३्र५ं’.ूङ्मे या संकेतस्थळावर नोंदणी प्रवेशिका उपलब्ध आहेत.

Web Title: International Yoga Festival in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.