इंटरनेट हा जन्मसिद्ध हक्क!
By admin | Published: April 28, 2015 01:16 AM2015-04-28T01:16:07+5:302015-04-28T01:16:07+5:30
सध्या भारतात जे लोक मोबाइल वापरतात त्यांना नेट न्यूट्रॅलिटीची फारशी माहिती नाही. कारण हे लोक मोबाइलच्या डेटा सर्व्हिसेसचा वापर फोन कॉल्सपेक्षा अधिक करतात.
नेट न्यूट्रॅलिटी मूलभूत अधिकार
सध्या भारतात जे लोक मोबाइल वापरतात त्यांना नेट न्यूट्रॅलिटीची फारशी माहिती नाही. कारण हे लोक मोबाइलच्या डेटा सर्व्हिसेसचा वापर फोन कॉल्सपेक्षा अधिक करतात. त्यामुळे नेट न्यूट्रॅलिटी नसल्यास अधिक पैसे द्यावे लागतील हे त्यांना माहीत हवे. जर नेट न्यूट्रॅलिटी नसेल तर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आपण कोणते संकेतस्थळ पाहायचे यावरही नियंत्रण आणू शकेल. त्यामुळे नेट न्यूट्रॅलिटी हा घटनेच्या अंतर्गत आणून आपला मूलभूत अधिकार बनविण्यात आला पाहिजे. ट्रायने टेलिफोन कंपन्यांना परवाने देताना नेट न्यूट्रॅलिटीचा अवलंब झाला पाहिजे, अशी घट घातली पाहिजे. मूलभूत अधिकाराइतके महत्त्व दिल्यामुळे या कंपन्या आपली पिळवणूक करू शकणाार नाहीत.
- अॅड. प्रशांत माळी, सायबर कायदेतज्ज्ञ
टेलीकॉम कंपन्यांचा फायदा नकोच
आजच्या तरुणाईला बेफिकिरीने व्यक्त होण्याचे एकमेव साधन म्हणजे इंटरनेट. इंटरनेट सेवेत कोणत्याही प्ररकारचा भेदभाव नसतो. पण या नेट न्यूट्रॅलिटीमुळे सर्वसामान्यांचे माहीत नाही पण टेलिकॉम कंपन्यांचे खिसे नक्कीच भरणार आहेत. मी नेट न्यूट्रॅलिटीचा समर्थक आहे. इंटरनेट हे माहिती आणि विचारांचे आदानप्रदान करण्याचे एक स्वतंत्र माध्यम आहे. त्यामुळे ट्रायने सर्वसामान्यांचा विचार केलाच पाहिजे. इंटरनेटच्या वापराबाबतच्या निष्कर्षांचाही विचार ट्रायने आपल्या निकालात करावा.
- संदेश कदम (सरस्वती इंजिनीअरिंग कॉलेज)
नेट न्यूट्रॅलिटी ही सेवा काहीशा प्रमाणात लागू व्हावी असे मला वाटते. काही बाबतीत इंटरनेटच्या होणाऱ्या अवाजवी वापराला आळा घालण्यासाठी नेट न्यूट्रॅलिटीला माझा पाठिंबा आहे. इंटरनेट सर्वांसाठीच आहे पण तरीही याला क ाहीतरी मर्यादा असाव्यात असे मला वाटते. सायबर क्राइमचा वाढता ग्राफ लक्षात
घेता इंटरनेटच्या वापरावर निर्बंधही
आले पाहिजेत.
- विक्रम कांबळे (बॉम्बे आयटीआय)
न्यूट्रॅलिटी ही गरज : मी नेट न्यूट्रॅलिटीला पाठिंबा देतो. नेट न्यूट्रॅलिटीत इंटरनेटच्या डाटा पॅकच्या मर्यादेत राहत तुम्ही फ्री कॉलिंग, मेसेजिंग आणि व्हिडीओ कॉलिंग करू शकता. पण एखादी कंपनी जर इंटरनेट सेवा पुरवत असेल, तर त्या कंपनीने पुरवल्या जाणाऱ्या सर्व अॅप्स आणि सेवांना सारखेच दर लावले पाहिजेत. नेट न्यूट्रॅलिटी ही आजची गरजच आहे म्हणण्यात काहीच गैर नाही.
- संकेत दांडेकर (एसआयडब्ल्यूएस कॉलेज)
थ्री चीअर्स फॉर न्यूट्रॅलिटी!
नेट न्यूट्रॅलिटी हा आपला अधिकार आहे. नेट न्यूट्रॅलिटीमुळे भविष्यात इंटरनेटच्या वापराबाबत काही बदलही घडून येतील. नेट न्यूट्रॅलिटीमुळे नक्कीच आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला एक नवी झळाळी मिळणार आहे यात शंकाच नाही. थ्री चीअर्स फॉर नेट न्यूट्रॅलिटी. मानवी हक्कांना एका वेगळ्या स्तरावर नेण्यासाठी नेट न्यूट्रॅलिटीचा वापर होणार आहे.
- अनुराधा नवलकर (एमडी कॉलेज)
विशिष्ट वेबसाइटसाठी वेग कमी
टेलीकॉम सेवा ही जास्तीत जास्त वापरली जात आहे. त्यामुळे त्यावर आकारला जाणारा कर हा वाढत चालला आहे. टेलीकॉम कंपन्यांचा व्यवसाय खालावत असल्यामुळे ठरावीक वेबसाइट कमी किमतीत ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहक त्या साइट्स जास्त प्रमाणात वापरत आहेत. टेलीकॉम कंपनी एखाद्या विशिष्ट वेबसाइटसाठी पैसे घेत असेल आणि इतर वेबसाइटसाठी कमी वेग मिळत असेल तर ते चुकीचे आहे.
- विशाल तळवणेकर (भगूबाई महाविद्यालय)
टेलीकॉम कंपन्यांची
मुजोरगिरी थांबली पाहिजे
टेलीकॉम कंपन्यांमुळे एखादी साइट चालू केल्यावर कमी वेग घेऊन ती माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते. नेट न्यूट्रॅलिटी जर लागू करण्यात नाही आली तर टेलीकॉम कंपन्या या महत्त्वाचा माहितीस्रोत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास अडथळे निर्माण करू शकतील. त्यामुळे या प्रकल्पाने जर नेट न्यूट्रॅलिटीचे समर्थन केले तर तो या सर्वांचा विचार करूनच करावे. न्यूट्रॅलिटीमुळे टेलीकॉम कंपन्यांची मुजोरगिरी थांबेल. - प्रेरणा नर (डहाणूकर महाविद्यालय )
ग्राहकांची
कोंडी करू नये
इंटरनेटच्या वापराने म्हणजेच व्हॉट्सअॅप, हाइक यांसारख्या अॅप्समुळे सतत कॉन्टॅक्टमध्ये राहणे सोपे झाले आहे. पण आता जर या सोयींमुळे काही कंपन्यांना नुकसान होत असेल तर मी नेट न्यूट्रॅलिटीच्या विरोधात आहे. आधी याच कंपन्यांनी ग्राहकवर्ग आकर्षित व्हावा यासाठी या सर्व सोयी-सुविधा चालू केल्या आणि आता यांचा अपव्यय होत असेल असे या कंपन्यांना वाटत असेल तर यात ग्राहक वर्ग जबाबदार नाही. ‘ट्राय’ याविषयी जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेतही पारदर्शकता असली पाहिजे.
- अक्षय राजे
(भवन्स महाविद्यालय)
न्यूट्रॅलिटी हवी, पण मर्यादेसोबत
एअरटेल कंपनीने यापूर्वीही सर्व कॉल्स तसेच नेटचे चार्जेस वाढवले होते आणि त्यात शाहरूख खानसारखी व्यक्ती या चळवळीला साथ देत असेल तर मीदेखील या बाबींचा समर्थक आहे. इंटरनेट कनेक्शन ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे गरजेनुसार नेट न्यूट्रॅलिटीचे समर्थक असणे काहीच चुकीचे नाही. पण लहान गोष्टीतही या कंपनींनी असेच दर प्रत्येक वेळी लावले तर ग्राहकवर्गाचेही नुकसान होईल.
- निखिल माने
(साठ्ये महाविद्यालय)