विद्यावेतनाच्या वाढीसाठी इंटर्न्स डॉक्टर संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 06:03 AM2019-07-17T06:03:37+5:302019-07-17T06:03:39+5:30
विद्यावेतनाच्या वाढीसाठी राज्यातील इंटर्न्स डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Next
मुंबई : विद्यावेतनाच्या वाढीसाठी राज्यातील इंटर्न्स डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार पत्रव्यवहार, काळ्या फिती बांधून निषेध करूनही यंत्रणांना जाग येत नाही. त्यामुळे आता येत्या २२ जुलैपासून राज्यातील असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स महाराष्ट्र या संघटनेने बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे.
सध्या इंटर्न्स डॉक्टरांना केवळ सहा हजार रुपये विद्यावेतन मिळते आहे. याआधी इंटर्न डॉक्टरांनी आंदोलन केले असता हा स्टायपेंड ११ हजार रुपये वाढवून देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्यापही अजून या आश्वासनाची पूर्ती झालेली नाही. आता इंटर्न डॉक्टरांनी २0 हजार रुपये विद्यावेतनाची मागणी केली आहे.