मुंबई : लेखक, अभिनेता, शिक्षक आणि गीतकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनीअसलेले दीपक रमोला यांच्यांशी संवाद साधण्याची संधी ‘प्रभा खैतानफाऊडेंशन (कोलकाता) आणि एहसान वुमेन ऑफ मुंबई’ या संस्थेमुळे त्यांच्याचाहत्यांना मिळाली. प्रभा खैतान फाऊडेंशन विविध समविचारी संस्था आणि लोकांच्या सहकार्यानेसंस्कृती, साहित्य, कला या क्षेत्राला प्रोत्साहन देते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ‘कलम’ वुईथ रायटर, अॅक्टर, लिरिसिस्टअॅण्ड टीचर दीपक रमोला’ या उपक्रमतहत ५ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्यासंवादात्मक व्हर्च्युअल सत्राने अनेकांना जीवन, ज्ञान, अवती भवतीचे माणसं यांच्याबाबतीत त्यांची प्राजंळ मते ऐकता आली.एहसान वुमेन ऑफ मुंबईच्यास्वाती अगरवाल यांनी दीपक रोमेला यांचा परिचय करुन दिला, तर वाचक आणिचाहत्यांच्या वतीने एहसास वुमन ऑफ अमृतसरच्या प्रणित बब्बर यांनीत्यांच्याशी संवाद साधला. डॉ. संधू छेत्री यांनी ‘ दीपक रमोला यांच्या‘५० टफेस्ट क्वेशन्स ऑफ लाईफ’ या पुस्तकासंदर्भात व्यक्त केलेलाअभिप्राय उद्धृत करुन या संवादाची सुरुवात करण्यात आली. हे सत्रप्रेरणादायी राहिले. ‘प्रोजेक्ट फ्यूएल’प्रकल्पाबाबत दीपक रमोला भरभरुन बोलतात. माझी आईच माझी प्रेरणा आहे. आठवीत असतांनाच आईला शाळा सोडावी लागली, परंतु, आईचेबोलणे आणि ज्ञानाने ती अद्वितीय आहे. विविध क्षेत्रातून ज्ञानाचे कणगोळा करण्याची प्रेरणा आईचीच. शाळेत असल्यापासून अशा पद्धतीने रोमेलाज्ञान मिळविणे सुरु केले. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत जीवनाचे अगाधज्ञान मिळवित आणि कोणतीही चुक न करणारक मी पहिला असेल, अशी त्यांची धारणाहोती, परंतु, चुका न करणे हीच मोठी चूक ठरेल, याची जाणीवही त्यांना लवकरचझाली. ‘प्रोजेक्ट फ्यूएल’ म्हणजे विविध क्षेत्रातून मिळालेल्या जीवनज्ञानाचाप्रसार सांस्कृतिक माध्यमातून लोकांपर्यत करणारा हा अनोखा ज्ञानयज्ञचहोय.काबूल (अफगाणिस्तान) येथील शाळेत अध्यापन करीत असतांना त्यांना हे पुस्तकलिहिण्याची प्रेरणा मिळाली. २०१५ मध्ये तालिबानांनी कब्जा करेपर्यंतबचावलेली ही शेवटची शाळा होती.शाळेच्या प्राचार्यांनी सांगितले होते की, ‘‘ जीवन म्हणजे प्रश्नांतूनउत्तरे शोधणे होय’. त्यांनी दिलेला हा धडा मला सदोदित विचारांसाठीउद्युक्त करीत आला. २०१५ पासून त्यांनी विविध ठिकाणांहून अत्यंत कठीणप्रश्न गोळा करण्याचे अभियानच सुरु केले. तीन हजारांहून अधिक कठीणप्रश्नावलीतून त्यांनी पुस्तकासाठी प्रश्नांची संक्षिप्त यादी केली.कोणाच्या प्रश्नाला यातून समाधानकारक उत्तर जरुर मिळेल. योग्य वेळी,योग्य ठिकाणी योग्य प्रश्न विचारल्यास अचूक उत्तर मिळतेच. वयाच्या चोवीसव्या वर्षी यशाला त्यांनी गवसणी घातली आहे. त्यांच्याशीझालेल्या संवादातून २०१६ मध्ये त्यांनी केलेला युरोप दौºयावरही प्रकाशपडला. सिरियन निर्वासितांच्या भागात आलेले अनुभवही त्यांनी सांगितले. ९० दिवसांचा दौरा सकारात्मक प्रकाशवाट दाखविणारा होता. निर्वासितांचानिरोप घेण्याचा क्षण भावूक होता. ‘अंतरंगी यारी’ या गाण्याची रचना आणि महानायक अमिताभ व फरहान अख्तरयांनी हे गाणे गायिले, हा माझ्या आयुष्यातील सुखावह क्षण...!
बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले दीपक रमोला यांच्याशी साधलेला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 1:47 AM