Join us

समुद्रकिनाºयांच्या स्वच्छतेसाठी धोरण आणणार - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 4:20 AM

वर्सोवा किना-याच्या स्वच्छतेसाठी स्वच्छतादूत अफरोज शाह आणि त्यांच्या सहकाºयांनी सुरू केलेल्या मोहिमेत रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग नोंदवला

मुंबई : वर्सोवा किना-याच्या स्वच्छतेसाठी स्वच्छतादूत अफरोज शाह आणि त्यांच्या सहकाºयांनी सुरू केलेल्या मोहिमेत रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग नोंदवला. राज्य शासनाने, समुद्र्र आणि समुद्र्रकिनाºयांची सर्वांगीण स्वच्छता आणि संवर्धनासाठी सर्वांगीण धोरणाचा मसुदा तयार करण्याचे काम अफरोज शाह यांच्याकडे दिले आहे. या मसुदा सादर झाल्यानंतर त्यावर आणखी संशोधन करून राज्य शासन याबाबतचे धोरण निश्चित करेल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.अफरोझ शाह आणि त्यांच्या सहकाºयांनी सुरू केलेली मोहीम काही दिवसांपासून बंद होती. स्थानिक गुंडांचा त्रास आणि महापालिकेच्या अनास्थेमुळे मोहीम थांबवत असल्याचे शाह यांनी जाहीर केले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाह आणि त्यांच्या सहकाºयांशी चर्चा करून राज्य सरकार त्यांच्या पूर्ण पाठीशी असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे.मुंबई शहरातून दररोज साधारण २१०० एमएलडी सांडपाणी समुद्रात सोडले जाते. हे रोखण्यासाठी आपल्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने काही निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार लवकरच मुंबईत समुद्रात सोडले जाणारे सर्व सांडपाणी हे प्रक्रिया करून सोडले जाईल. त्यासाठी आम्ही काम करीत आहोत. प्लॅस्टिकमुळेही समुद्र्रकिनारे आणि समुद्रात मोठे प्रदूषण होत आहे. प्लॅस्टिकवर निर्बंध आणण्याबाबत येत्या सहा महिन्यांत कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत लोकांची मतेही जाणून घेण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. चांगले काम करणाºया प्रत्येक व्यक्तीला राज्य सरकार पूर्ण प्रोत्साहन आणि संरक्षण देईल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस