ग्रामीण संस्कृतीचा आविष्कार उलगडणार!

By admin | Published: August 7, 2015 01:43 AM2015-08-07T01:43:06+5:302015-08-07T01:43:06+5:30

२०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील महाराष्ट्रातील रंगचित्रे आणि कलावस्तूंचे प्रदर्शन मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. श्लोक आणि भारत सरकारच्या

The invention of rural culture will unfold! | ग्रामीण संस्कृतीचा आविष्कार उलगडणार!

ग्रामीण संस्कृतीचा आविष्कार उलगडणार!

Next

मुंबई : २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील महाराष्ट्रातील रंगचित्रे आणि कलावस्तूंचे प्रदर्शन मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. श्लोक आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या ‘दि नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
‘रिथिंकिंग दि रिजनल’ हे या प्रदर्शनाचे मुख्य विषयसूत्र असून ७ आॅगस्ट रोजी फोर्ट येथील नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न येथे संध्याकाळी ५ वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून, ‘एनजीएमए’च्या अध्यक्षा डॉ. फिरोझा जे. गोदरेज, खासदार व ‘लोकमत’चे अध्यक्ष विजय दर्डा, ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा आदी मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत. ८ आॅगस्टपासून रसिक प्रेक्षकांसाठी हे प्रदर्शन खुले करण्यात येणार आहे. जे.जे. स्कूल आॅफ आर्ट््सच्या माजी अधिष्ठाता व विद्यमान प्राध्यापक डॉ. मनीषा पाटील या प्रदर्शनाच्या क्युरेटर असून, श्लोकच्या संस्थापिका शीतल दर्डा प्रकल्प संचालक आहेत. एक्झर्बिया डेव्हलपर्स आणि सिद्धिटेक ग्रुप हे या प्रदर्शनाचे अनुक्रमे मुख्य व सहप्रायोजक आहेत. हे प्रदर्शन ८ आॅगस्ट ते २० सप्टेंबरदरम्यान सुरू राहणार असून, ‘बिइंग कन्टेम्पररी’ या विषयावर १२ सप्टेंबर रोजी कार्यशाळा होणार आहे. उदयोन्मुख कलावंतांना पुढे आणून त्यांची कला जगापुढे आणण्याच्या हेतूने शीतल दर्डा यांनी ‘श्लोक’ची स्थापना केली. (प्रतिनिधी)

Web Title: The invention of rural culture will unfold!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.