57 हजार गुंतवा, दिवसाला 4 हजार रुपयांचे व्याज देतो; ‘ईडी’ने केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 01:06 PM2023-09-30T13:06:42+5:302023-09-30T13:07:49+5:30

तुम्ही अशा योजनेचे बळी आहात का?, ‘ईडी’ची कारवाई

Invest 57 thousand; Pays interest of Rs. 4 thousand per day | 57 हजार गुंतवा, दिवसाला 4 हजार रुपयांचे व्याज देतो; ‘ईडी’ने केली कारवाई

57 हजार गुंतवा, दिवसाला 4 हजार रुपयांचे व्याज देतो; ‘ईडी’ने केली कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आमच्या कंपनीच्या योजनेत ५७ हजार रुपये गुंतवा, पुढच्या तीन महिन्यांसाठी तुम्हाला प्रत्येक दिवशी दिवसाला ४ हजार रुपये व्याज देतो, असे सांगत देशाच्या अनेक राज्यातील लाखो गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या एचपीझेड ॲप कंपनीला सक्तवसुली संचालनालयाने पुन्हा एकदा दणका देत कंपनीची ५५ कोटी ३६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये कंपनीच्या बँक खात्यातील या रकमेचा समावेश आहे.  उपलब्ध माहितीनुसार, एचपीझेड कंपनीने गुंतवणुकीसाठी स्वतःचे ॲप तयार केले होते व या ॲपच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना अवास्तव व्याज देण्याची घोषणा केली. 

  ज्या गुंतवणूकदारांनी ५७ हजार रुपयांची गुंतवणूक केली त्यांना तीन महिन्यांसाठी दररोज ४ हजार रुपये व्याज देण्याची घोषणा केली. 
   योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना पहिले काही दिवस हे पैसे देण्यातही आले. 
   कंपनीचे अन्य व्यवहार सुरू असल्याने जर गुंतवणूकदारांनी आणखी पैसे गुंतवले तर हा परतावा देणे शक्य असल्याचे कंपनीने जाहीर केले. 
   यानंतर गुंतवणूकदारांनी अनेक राज्यांत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 

देशभर घाेटाळ्याची व्याप्ती
या घोटाळ्याची व्याप्ती देशभर असल्यामुळे व मोठ्या प्रमाणावर क्लिष्ट आर्थिक व्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाचा तपास ‘ईडी’कडे वर्ग करण्यात आला. 

वर्षभरात आतापर्यंत 
१८ ठिकाणी छापे
   याप्रकरणी २०२२ साली ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी देशाच्या विविध राज्यांत २६ ठिकाणी, तर चालू वर्षात आतापर्यंत १८ ठिकाणी छापेमारी करीत आतापर्यंत एकूण १७६ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. 
  दरम्यान, या गुंतवणूक योजनेप्रमाणेच कंपनीने ऑनलाइन गेमिंग आणि सट्टेबाजी आपल्या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देत त्याद्वारे देखील मोठा पैसा कमावला आहे. त्या व्यवहारांचा देखील आता तपास होत आहे.

Web Title: Invest 57 thousand; Pays interest of Rs. 4 thousand per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.