'दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी करा'; दिशाच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 20:32 IST2025-03-19T20:15:30+5:302025-03-19T20:32:56+5:30
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे.

'दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी करा'; दिशाच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. याबाबत दिशा सालियन यांच्या आई-वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. दिशावर सामुहिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याचा उल्लेख याचिकेत केला आहे.
कुराणच्या 'आयत' लिहिलेल्या चादरी जाळल्या नाही; नागपूर हिंसाचाराबाबत फडणवीसांची माहिती
यापूर्वी दिशाच्या वडिलांनी आपली काहीही तक्रार नसल्याचे म्हटले होते. पण, आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान,दिशा सालियनच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. किोरी पेडणेकर यांनी नजरकैदेत ठेवले, तपासावेळचे पुरावे खरे मानण्यात भाग पाडले. त्यावेी मुंबई पोलिसांनी दबाव टाकल्याचा आरोपही दिशाच्या वडिलांनी केला आहे.
यावर मंत्री नितेश राणे यांनी प्रितिक्रिया दिली आहे. राणे म्हणाले, मी आधीपासून हेच सांगत आहे. दिशा सालियानचा खून झाला होता. आदित्य ठाकरेंचें ८ जूनच मोबाईल लोकेशन तपासा, तिथल्या वॉचमनचं काय झालं? हे मी आधीपासून विचारत होतो. आज तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आमच्यावर खोटारडेपणाचा आरोप करणारे आता काय बोलणार?, असा सवालही राणे यांनी केला.