कर्नाळा बँकप्रकरणी तातडीने चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:08 AM2021-01-16T04:08:08+5:302021-01-16T04:08:08+5:30

- उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निर्देश कर्नाळा बँकप्रकरणी तातडीने चौकशी करा - उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निर्देश लोकमत न्यूज ...

Investigate the Karnala Bank case immediately | कर्नाळा बँकप्रकरणी तातडीने चौकशी करा

कर्नाळा बँकप्रकरणी तातडीने चौकशी करा

Next

- उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

कर्नाळा बँकप्रकरणी तातडीने चौकशी करा

- उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कर्नाळा सहकारी बँकेत अनेक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ठेवी आहेत. बँकेच्या कामकाजात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींमुळे ठेवीदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. या ठेवीदारांच्या हितासाठी बँकेवर तातडीने कारवाई करावी, तसेच गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातील तक्रारींची चौकशी वेळेत पूर्ण करून दोषींवर कारवाई करावी, असे निर्देश विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी दिले.

कर्नाळा सहकारी बँक ठेवीधारकांना न्याय देणे, अवैध खासगी सावकारीवर नियंत्रण, ग्रामीण भागातील शेतीमालाचे गोदाम बांधकामबाबत सहकारी बँक व सहकार विभागाची भूमिका, या विषयांवर शुक्रवारी विधान भवनात उपसभापती गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे बैठक झाली. कर्नाळा बँकेचे अन्य बँकेत विलीनीकरण करून ठेवीदारांना तातडीने न्याय देता येईल का, यासंबंधी सहकार विभागाने प्रस्ताव तयार करावा. बँक, पतसंस्था, खासगी सावकार यांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्यास त्यांना तातडीने सहकार विभागाशी संपर्क साधता यावा यासाठी सहकार विभागाने हेल्पलाइन नंबर आणि व्हॉटस्‌ॲप नंबर जाहीर करावा, त्यामुळे शेतकरी आणि ठेवीदारांना वेळीच मदत होईल, असे गोऱ्हे म्हणाल्या.

सहकार विभागाचे प्रधान सचिव अरविंदकुमार म्हणाले की, राज्यातील अनियमित व्यवहार झाले आहेत, त्या सर्व बँकांचे मागील पाच वर्षांतील लेखा परीक्षणाचे अहवाल तपासून दोषींवर कारवाई करण्यात येईल.

..........................

Web Title: Investigate the Karnala Bank case immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.