Join us  

"अंधेरीतील कामगार रुग्णालय प्रशासन व कंत्राटदार यांची चौकशी करा"; काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 3:34 PM

केंद्रीय कामगार मंत्री भूपेश यादव यांना राजेश शर्मा यांनी पत्र पाठवून ढिम्म रुग्णालय प्रशासन व कामचुकार कंत्राटदार यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

मुंबई - अंधेरीतील कामगार रुग्णालय मागील दोन- तीन वर्षांपासून बंद आहे. या रुग्णालयाचे काम लवकर पूर्ण व्हावे तसेच सर्व साहित्य खरेदी करण्यासाठी सरकारने कंत्राटदारही नेमला असेल पण अद्याप हे रुग्णालय सूरू झालेले नाही. रुग्णालय बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. रुग्णालय फुरू होण्यातील दिरंगाई प्रकरणी रुग्णालय प्रशासन व कंत्राटदार यांची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शर्मा यांनी केंद्रीय कामगार मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे.

केंद्रीय कामगार मंत्री भूपेश यादव यांना राजेश शर्मा यांनी पत्र पाठवून ढिम्म रुग्णालय प्रशासन व कामचुकार कंत्राटदार यांच्या चौकशीची मागणी केली आहे. कामगार राज्य विमा योजनेचे अंधेरीतील रुग्णालय हे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल म्हणून कार्यरत होते. या ठिकाणी राज्यभरातून कामगार वैद्यकीय सेवा घेण्यासाठी येत होते. हे रुग्णालय बंद असल्यामुळे कामगारांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. रुग्णालय प्रशासनाने जनतेला गृहित धरले आहे. पण आपण या प्रकरणाची दखल घेऊन  रुग्णालय सेवा लवकर सुरू करावी अन्यथा जनतेत रोष उत्पन्न होईल, असेही शर्मा म्हणाले.. 

टॅग्स :मुंबईकाँग्रेसअंधेरी