रायचा जबाब नोंदवणारा तपास अधिकारी स्वतंत्र साक्षीदार नाही
By admin | Published: May 4, 2017 03:25 AM2017-05-04T03:25:29+5:302017-05-04T03:25:29+5:30
शीना बोरा हत्येप्रकरणी माफीचा साक्षीदार असलेल्या श्यामवर रायने चौकशीदरम्यान केलेल्या खुलाशाची माहिती पोलीस
मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणी माफीचा साक्षीदार असलेल्या श्यामवर रायने चौकशीदरम्यान केलेल्या खुलाशाची माहिती पोलीस निरीक्षकाने न्यायालयाला साक्ष म्हणून दिली असली तरी ती साक्ष पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.
शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर रायला अटक केल्यानंतर त्याची चौकशी करणाऱ्या पोलीस निरीक्षकलाही साक्षीदारांच्या यादीत सीबीआयने समाविष्ट केले. त्याविरुद्ध इंद्राणी व पीटर मुखर्जीने उच्च न्यायालयात धाव घेतली.
बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याप्र्रकरणी श्यामवर रायला खार पोलिसांनी २०१४मध्ये अटक केली. या प्रकरणी त्याची चौकशी करत असताना त्याने शीना बोराच्या हत्येची माहिती पोलिसांना दिली तसेच शीनाला जेथे पुरण्यात आले ती जागाही पोलिसांना दाखवली. त्याच्या या खुलाशामुळे इंद्राणी व पीटरने एवढी वर्षे लपवलेले सत्य बाहेर होते. (प्रतिनिधी)