तंबाखूरहित मोहिमेत ३ हजार टपाल कर्मचाऱ्यांची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 02:02 AM2020-01-10T02:02:40+5:302020-01-10T02:02:53+5:30

लोकांना थेट सेवा देणा-या विविध समाजघटकांच्या कल्याणासाठी काम केल्यानंतर कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए) आता सर्वसामान्यांचा मित्र समजला जाणा-या पोस्टमनसाठी विशेष योजना राबवत आहे.

Investigation of 3,000 postal workers in non-tobacco campaigns | तंबाखूरहित मोहिमेत ३ हजार टपाल कर्मचाऱ्यांची तपासणी

तंबाखूरहित मोहिमेत ३ हजार टपाल कर्मचाऱ्यांची तपासणी

Next

मुंबई : लोकांना थेट सेवा देणा-या विविध समाजघटकांच्या कल्याणासाठी काम केल्यानंतर कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए) आता सर्वसामान्यांचा मित्र समजला जाणा-या पोस्टमनसाठी विशेष योजना राबवत आहे. तंबाखू सेवनाच्या हानिकारक अशा सवयीच्या विरोधातील ही मोहीम पोस्टमन कर्मचाऱ्यांमध्ये राबविली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत पोस्टमनसाठी विविध वैद्यकीय चाचण्या आणि तपासण्यासुद्धा शिबिराच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत. त्याद्वारे तंबाखू सेवनाच्या सवयीमुळे जडलेल्या व्याधी आणि आजार यांचे निदान होईल आणि त्यावर उपाययोजना करणे सोपे जाईल. या माध्यमातून पोस्ट कार्यालय तंबाखूरहित करण्याचा उद्देशही आहे.
तंबाखूरहित पोस्ट आॅफिस, मुंबई विभाग या योजनेचा शुभारंभ गुरुवार, ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मुंबई जीपीओच्या तळमजल्यावरील बायसेंटेनियल हॉल येथे करण्यात आला. या वेळी मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे, सीपीएएचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वाय. के. सप्रू, सीपीएएच्या कार्यकारी संचालिका अनिता पीटर आणि गायिका नेहा भसीन यासुद्धा उपस्थित होत्या.
मागील वर्षी सीपीएएने टॅक्सी आणि आॅटोरिक्षा चालकांसाठी अशा प्रकारची एक मोहीम राबविली होती़ त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. तीच परंपरा पुढे चालू ठेवत सीपीएए यंदा नवीन मोहीम दाखल करीत असून ती मुंबई विभाग पोस्ट कर्मचाºयांमध्ये राबविली जाणार आहे. हे कर्मचारी त्यांच्या व्यस्त व विषम अशा जीवनशैलीमुळे तंबाखूच्या व्यसनाला बळी पडतात आणि त्यामुळे ही मोहीम महत्त्वाची ठरते. मोहिमेदरम्यान ३ हजाराहून अधिक पोस्टमन महिला आणि पुरुषांची तपासणी आणि चाचणीसुद्धा केली जाणार आहे. या समाजघटकाला ते करीत असलेल्या कामामुळे सर्वसामान्य जनतेत फार जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे स्थान आहे़ त्यामुळेसुद्धा ही मोहीम महत्त्वाची असल्याचे सीपीएएच्या कार्यकारी संचालिका अनिता पिटर यांनी सांगितले.
या मोहिमेमध्ये विविध चाचण्या आणि तपासण्या होणार असून त्यात डोके आणि मानेच्या तपासण्यांचाही समावेश आहे. डोके व मान तपासणी प्रख्यात डॉक्टरांकडून केली जाणार आहे. या शिबिरामध्ये रुटीन ब्लड टेस्ट झ्र एचबी आणि डब्ल्यूबीसीची डॉक्टरांकडून सर्वसाधारण तपासणी केली जाणार असून, दातांवरील तंबाखूच्या परिणामांची तपासणीसुद्धा होणार आहे.

Web Title: Investigation of 3,000 postal workers in non-tobacco campaigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.