मुकेश अंबानी धमकीप्रकरणी एटीएसकडूनही तपास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 05:48 AM2022-08-17T05:48:19+5:302022-08-17T05:48:48+5:30

Mukesh Ambani threat case : अंबानी यांच्या रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये धमकीचे  कॉल करणारा ५६ वर्षीय भौमिक हा मानसिक रुग्ण असल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला आहे.

Investigation by ATS also in Mukesh Ambani threat case | मुकेश अंबानी धमकीप्रकरणी एटीएसकडूनही तपास

मुकेश अंबानी धमकीप्रकरणी एटीएसकडूनही तपास

googlenewsNext

मुंबई : अँटिलिया धमकी प्रकरणानंतर उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याच्या धमकी देणारा विष्णू भौमिक याला डी.बी. मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्या तरी यामागे अन्य कुणाचा हात आहे का, या दिशेने एटीएस समांतर तपास करीत आहे.        
अंबानी यांच्या रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये धमकीचे  कॉल करणारा ५६ वर्षीय भौमिक हा मानसिक रुग्ण असल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला आहे. दहिसर येथून भौमिकला ताब्यात घेतल्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. आरोपी भौमिक हा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय करतो. न्यायालयाने भौमिकला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Investigation by ATS also in Mukesh Ambani threat case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.