मुंबई : अँटिलिया धमकी प्रकरणानंतर उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याच्या धमकी देणारा विष्णू भौमिक याला डी.बी. मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्या तरी यामागे अन्य कुणाचा हात आहे का, या दिशेने एटीएस समांतर तपास करीत आहे. अंबानी यांच्या रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये धमकीचे कॉल करणारा ५६ वर्षीय भौमिक हा मानसिक रुग्ण असल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला आहे. दहिसर येथून भौमिकला ताब्यात घेतल्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. आरोपी भौमिक हा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय करतो. न्यायालयाने भौमिकला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुकेश अंबानी धमकीप्रकरणी एटीएसकडूनही तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 5:48 AM