Join us

उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरु; राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 12:47 PM

राज्य सरकारने हार्यकोर्टात माहिती दिली आहे. 

मुंबई- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांवरील बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांचं प्रकरणाची सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित झालं आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून चौकशीही सुरु करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारने हार्यकोर्टात माहिती दिली आहे. 

उद्धव ठाकरे कुटुंबीयांविरोधात सीबीआय व ईडीमार्फत तपास करण्याचा आदेश द्यावा, अशा विनंतीच्या गौरी भिडे यांनी फौजदारी जनहित याचिका केली आहे. 'ही याचिका केवळ गृहितकांवर आधारित आहे. शिवाय याचिकाकर्त्यांनी अन्य कायदेशीर मार्गांचाही अवलंब केलेला नाही. ठाकरे आता सत्तेत नसल्याने चौकशीवर प्रभाव टाकला जाण्याचा आरोपही होऊ शकत नाही', असा युक्तिवाद मांडून ही याचिका सुनावणीयोग्यच नसल्याचा आक्षेप ठाकरेंच्या वकिलांनी नोंदवला. 

ठाकरेंच्या वकिलांच्या या आक्षेपानंतर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला. मात्र, दुपारच्या सत्रात मुख्य सरकारी वकील अरुणा पै यांनी या विषयाचा खंडपीठासमोर पुन्हा उल्लेख करून ईओडब्ल्यूने प्राथमिक चौकशी सुरू केली असल्याची माहिती दिली हायकोर्टात दिली. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा गंभीर आरोप करत गौरी भिडे यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेची सीबीआय आणि ईडीद्वारे चौकशी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :उद्धव ठाकरेउच्च न्यायालय