मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा तपास एसीपी नितीन अलकनुरेंच्या नेतृत्वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:09 AM2021-03-04T04:09:41+5:302021-03-04T04:09:41+5:30

८०० सीसीटीव्हीची तपासणी.. ३० जणांकड़े चौकशी मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा तपास एसीपी नितीन अलकनुरेंच्या नेतृत्वात ३० जणांची चौकशी; ८०० ...

The investigation into the Mukesh Ambani threat case is headed by ACP Nitin Alaknure | मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा तपास एसीपी नितीन अलकनुरेंच्या नेतृत्वात

मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा तपास एसीपी नितीन अलकनुरेंच्या नेतृत्वात

Next

८०० सीसीटीव्हीची तपासणी.. ३० जणांकड़े चौकशी

मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा तपास एसीपी नितीन अलकनुरेंच्या नेतृत्वात

३० जणांची चौकशी; ८०० सीसीटीव्हींची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटके असलेल्या कारच्या तपासाचे सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) नितीन अलकनुरे प्रमुख असतील. पोलिसांनी आतापर्यंत ८०० सीसीटीव्ही तपासले असून, ३० जणांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदविले.

मुकेश अंबानी यांच्या अँटालिया निवासस्थानाजवळ स्फोटके असलेली स्कॉर्पियो पार्क करून आरोपी इनोव्हामध्ये बसून पसार झाला. या कारमध्ये सुमारे अडीच किलो वजनाच्या जिलेटीनच्या कांड्या हाेत्या. ‘मुंबई इंडियन्स’ लिहिलेल्या बॅगेत अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारी चिठ्ठीही सापडली. स्कॉर्पियो कार १७ फेब्रुवारीच्या रात्री मुलुंड-ऐरोली उड्डाणपुलाजवळून चोरण्यात आली हाेेेेेती, तर इनोव्हा कारवरील नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणाचा तपास एसीपी नितीन अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, जैश उल हिंद या संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली ती पोस्ट देखील बनावट असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.

Web Title: The investigation into the Mukesh Ambani threat case is headed by ACP Nitin Alaknure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.