किशोरी पेडणेकरांची आर्थिक गुन्हे शाखेत चौकशी; कोविड घोटाळाप्रकरणी आणखी तपास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 07:08 PM2023-09-11T19:08:09+5:302023-09-11T19:08:58+5:30

कोविडमुळे मृत्यू झालेल्या लोकांना नेण्यासाठी महापालिकेने बॉडी बॅग्सची खरेदी केली होती

Investigation of Kishori Pednekar in the Economic Offenses Branch in the case of the alleged Kovid scam | किशोरी पेडणेकरांची आर्थिक गुन्हे शाखेत चौकशी; कोविड घोटाळाप्रकरणी आणखी तपास

किशोरी पेडणेकरांची आर्थिक गुन्हे शाखेत चौकशी; कोविड घोटाळाप्रकरणी आणखी तपास

googlenewsNext

मनोज गडनीस

मुंबई - कोव्हीड काळात मुंबई महानगर पालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्समध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची सोमवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोन तास चौकशी केली. सकाळी ११ वाजता त्या पोलिस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाल्या होत्या. 

कोविडमुळे मृत्यू झालेल्या लोकांना नेण्यासाठी महापालिकेने बॉडी बॅग्सची खरेदी केली होती. मात्र, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणी किशोरी पेडणेकर व महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अटकेची शक्यता वर्तविण्यात होती मात्र, किशोरी पेडणेकर यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती. ४ सप्टेंबर रोजी न्यायालयाने त्यांना चार आठवड्यासाठी अटकेपासून संरक्षण दिले होते. तसेच, ११ सप्टेंबर, १३ सप्टेंबर व १६ सप्टेंबर रोजी त्यांना पोलिसांतर्फे होणाऱ्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार, किशोरी पेडणेकर चौकशीसाठी दाखल झाल्या होत्या.

 

Web Title: Investigation of Kishori Pednekar in the Economic Offenses Branch in the case of the alleged Kovid scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.