संशयित मुलांच्या फेसबुक, इन्स्टाग्रामची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 06:00 AM2018-05-18T06:00:37+5:302018-05-18T06:00:37+5:30
अथर्व शिंदेच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचा प्रयत्न सध्या आरे पोलीस करीत आहेत.
मुंबई : अथर्व शिंदेच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचा प्रयत्न सध्या आरे पोलीस करीत आहेत. त्यासाठी पार्टीत सहभागी तरुणांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट तपासण्यात येत आहेत. पार्टीसाठी आॅनलाइन बुकिंग करणाऱ्यांची तसेच ड्रग्जच्या वापराबाबतची माहिती मिळविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अथर्वसोबत पार्टी करणाºया सर्वच मुलांनी अमलीपदार्थांचे व्यसन केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या सोशल साईटवरील अकाउंटची पडताळणी केली जात आहे. अथर्वचा मृत्यू मारहाणीने झाला असावा असा संशय त्याच्या शरीरावरील जखमांवरून पोलिसांना आहे. मात्र परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार त्याला बंगल्यात अथवा बंगल्याच्या बाहेर मारहाण झाल्याचा एकही पुरावा त्यांना अद्याप सापडलेला नाही. साउंड इंजिनीअरिंगच्या तिसºया वर्षात शिकणाºया अथर्वच्या मित्रांचीही आरे पोलिसांनी चौकशी केल्याचे समजते. अथर्व हा पोलीस अधिकाºयाचा मुलगा असल्यानेही या प्रकरणाचा उलगडा लवकरात लवकर करण्याचे दडपण पोलिसांवर आहे.