मुंबई : गॅगस्टर एजाज लकडावाला आणि त्याच्या दोघा हस्तकांच्या अटकेतून अनेक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. खंडणी, हप्तावसुलीसारख्या त्यांच्या कृत्यांना एका आयपीएस अधिकाºयासह पोलीस अधिकाऱ्यांचे ‘अभय’ मिळत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाºयांना मिळाली आहे. तारीक परवीन व सलीम महाराज या गुंडांनी त्याबाबतचा गौप्यस्फोट आपल्या जबाबात अधिकाºयाकडे केला आहे. त्यामुळे पहिल्या टप्यात एका सहाय्यक आयुक्तासह निरीक्षकाकडे गुन्हे अन्वेषण शाखा चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्यावर अटकेच्या कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे.
एका फळ व्यापाºयाकडे दोन कोटीची खंडणीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या तारीक परवीन हा पुर्वाश्रमी दाऊद इब्राहिमचा हस्तक म्हणून काम करीत होता. सध्या तो व त्याचा साथीदार सलीम महाराज एजाज लकडावाला याच्यासाठी काम करीत होते. तिघांना गुन्हा अन्वेषण शाखेने अटक केली आहे़ त्यांच्या जबाबातून पोलीस व गॅगस्टरच्या सलगीचे प्रकरण पुढे आले आहे. तारीकवर पायधुनी पोलीस ठाण्यात व्यापाºयाने खंडणीचा गुन्हा दाखल असताना एका वरिष्ठ अधिकाºयाच्या हस्तक्षेपामुळे हा गुन्हा एमआरए मार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. मात्र त्यानंतर या प्रकरणाचा काहीही तपास न होता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यासाठी जबाबदार असलेले एक सहाय्यक आयुक्त व पोलीस निरीक्षकाकडे चौकशी करण्यात येत आहे. आरोपीला सहकार्य करण्यात त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांनाही सहआरोपी करुन अटक केली जाण्याची शक्यता अधिकाºयांकडून वर्तविण्यात येत आहे.