मनीषा म्हात्रे, मुंबईमाहितीच्या अधिकाराखाली मागवलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणा-या डी विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांंचन बाणावलेकर यांच्या चौकशीचे आदेश मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी महापालिकेला दिले आहेत़महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात दोषी आढळल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा पर्यायही आयुक्तांनी पालिकेला दिला आहे़ तसेच संबंधित अर्जदाराला माहिती द्यावी, असेदेखील आयुक्तांनी पालिकेला सांगितले आहे़विशेष म्हणजे याआधीही एका प्रकरणात माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने बाणावलेकर यांना आयुक्तांनी १० हजार रुपये दंड ठोठावला होता, असे माहिती अधिकार कार्यकर्ता चेतन कोठारी यांनी सांगितले़वारंवार पत्रव्यवहार करूनही माहिती अधिकाराखाली मागविलेल्या माहितीबाबत टाळाटाळ होत असल्याने कोठारी यांनी माहिती आयुक्त गायकवाड यांंच्याकडे अपील केले होते. त्यात आयुक्तांनी हे आदेश दिले़तर दुसरीकडे डी विभागात काम करणाऱ्या कर्मचारीवर्गातही त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर आहे़ बाणवलेकर यांच्याकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून या कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलनही केले होते़ तसेच डी विभाग येथून बाणवलेकर यांंची बदली व्हावी, अशी मागणी महापालिका आरोग्यसेवा कर्मचारी संंघटना यांनी केली आहे. मागणीची पूर्तता झाली नाही तर पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे.
महिला अधिका-याची चौकशी
By admin | Published: November 22, 2014 1:02 AM