मुंबई : हेमा उपाध्याय आणि तिचा वकील हरीश भांबानी यांच्या दुहेरी खून प्रकरणात नवीन माहिती पोलीस तपासातून समोर येत आहे. यातील एक प्रमुख फरार आरोपी विद्याधर राजभरने चिंतन उपाध्यायशी संपर्कासाठी एक चॅटींग अॅप्लिकेशन इन्स्टॉल केले होते. चिंतनलाही हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी तो आग्रह करत होता. फोनच्या तपासातून ही माहिती समोर आली आहे.या हत्याकांडापूर्वी चिंतनला त्याच्या फोनवर काही कॉल आल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले तेव्हा पोलिसही काही काळ गोंधळून गेले. पण, नंतर याबाबत असा खुलासा झाला की, चिंतनने हा नंबर त्याच्या एका विदेशी मित्राला दिला होता. लंडनचा हा मित्र त्या वेळी काही दिवसांसाठी भारतात आला होता. दरम्यान, आणखी एका घटनाक्रमात चिंतनच्या वकीलांनी न्यायालयात धाव घेत सांगितले की, पोलीस चिंतनसाठी थर्ड डिग्रीचा वापर करत आहेत. त्यानंतर न्यायालयाने याबाबत पोलिसांना विचारणा केली. तसेच चिंतनची वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्यासही न्यायालयाने सांगितले आहे. बुधवारी जे. जे. हॉस्पिटलमध्ये चिंतनची वैद्यकीय चाचणी झाली. तथापि, चिंतनच्या वैद्यकीय चाचणीसाठी जे दोन दिवस लागले ते पोलीस कोठडी म्हणून गणले जाऊ नयेत, अशी विनंती आम्ही न्यायालयात करणार आहोत, अशी माहिती सह पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क) चिंतनच्या वडिलांना विचारले विसंगत प्रश्नतुम्ही चिंतनला बडोदा विद्यापीठाऐवजी जेजे स्कूल आॅफ आर्टस्मध्ये का टाकले, चीड व्यक्त करणारी चित्रे रेखाटण्याची कल्पना चिंतनच्या डोक्यात कुठून आली, यासारखे विसंगत प्रश्न पोलिसांनी विचारल्याचे चिंतन उपाध्याय याचे वडील विद्यासागर उपाध्याय यांनी सांगितले. चिंतन हा त्याची पत्नी हेमा उपाध्यायच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.पोलिसांना जबाब देण्यासाठी विद्यासागर मंगळवारी मुंबईत दाखल झाले. चिंतन घटस्फोटासाठी हेमाला मागेल ते देण्यास तयार होता. त्याचे कोणत्याही महिलेशी संबंध नव्हते. केवळ मन:शांतीसाठी त्याला घटस्फोट हवा होता, असे ते म्हणाले. या गुन्ह्यातील दुसरा प्रमुख आरोपी विद्याधरबाबत बोलताना ते म्हणाले, मी दोनदाच विद्याधरला भेटलो आहे. ५ डिसेंबरला तो जयपूर येथील घरी अचानक दुसऱ्यांदा त्याची भेट झाली होती.विद्याधरने चिंतनला काही टेक्स्ट मेसेज पाठविले होते. हाइक मॅसेंजर जॉइन करण्याची विनंती यात करण्यात आली होती. पण, हे मेसेज चिंतनने डिलिट केले. चिंतनचा ठावठिकाणा मिळविण्यासाठी पोलिसांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. पोलिसांनी राजभर समाजाला आवाहन केले आहे की, या प्रकरणात त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे. ‘हेमाशी मिटू न शकणारे मतभेद निर्माण झाले आहेत. सोबत राहणे शक्य नाही. त्यामुळे मला घटस्फोट हवा आहे, असे चिंतनने मला सांगितले होते. संबंधातील तणावाचा त्याच्या कामावर परिणाम होत होता व तसे होऊ नये, यासाठी त्याला घटस्फोट हवा होता. जुहूतील फ्लॅट दोघांच्या नावावर होता. या फ्लॅटचे बाजारमूल्य तीन कोटी रुपये असून हेमाने तेथून बाहेर पडावे म्हणून चिंतन तिला दीड कोटी रुपये देण्यासही तयार होता; परंतु तिने नकार दिला. त्याने तिला दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी करून देण्याचीही तयारी दर्शविली होती; मात्र या वाटाघाटी यशस्वी झाल्या नाहीत, असे ते म्हणाले.चिंतनच्या पत्नीला मधुमेह तसेच थॉयराइडसंबंधी आजार होता. तसेच अलीकडेच तिच्यावर गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यामुळे चिंतनला स्वत:कडे लक्ष देण्यासह आपल्या आजारी पत्नीकडेही तेव्हढेच लक्ष द्यावे लागत होते. चिंतन निरपराध आहे. विद्याधरचे वडील आजारी असताना चिंतनने त्याला पैसे दिले होते. चिंतन हे पैसे परत मागेल म्हणून तो त्याचे कॉल घेण्याचे टाळत होता, असेही विद्यासागर म्हणाले.
विद्याधरचे चिंतनला चॅटिंगसाठी इन्व्हिटेशन
By admin | Published: December 31, 2015 1:25 AM