बाबासाहेबांच्या स्मारकाच्या भूमीपूजनाचे निमंत्रण उद्धवना देणार - रावसाहेब दानवे
By admin | Published: October 10, 2015 04:50 PM2015-10-10T16:50:20+5:302015-10-10T19:46:23+5:30
इंदू मिलच्या जागेवर उभ्या राहणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण देणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - इंदू मिलच्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाचे निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचे भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे.
मान-अपमान विसरून बाबासाहेबांबद्दल प्रेम असणा-या सर्वांनी या कार्यक्रमाला यावे, असेही ते म्हणाले.
इंदू मिलच्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन समारंभापासून शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून फिरत होत्या. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या कार्यक्रमाला हजर न राहता, बीडला जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र असे काही नसल्याचे सांगत आज आपण उद्धव ठाकरेंना उद्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देणार असल्याचे दानवेंनी स्पष्ट केले.
इंदू मिलच्या कार्यक्रमापासून शिवसेनेला दूर ठेवत, या स्मारकाचे श्रेय शिवसेनेला मिळू न देण्याची खेळी भाजपाने केल्याचे बोलले जात होते. इंदू मिलच्या भूमिपूजन समारंभाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रिपाइं नेते आठवले हजर राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण ठाकरे यांना देण्यात न आल्याने चर्चा सुरू झाली होती.