जीवनावश्यक वस्तूंची आवक मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 04:49 AM2018-07-25T04:49:06+5:302018-07-25T04:49:33+5:30

मराठा आंदोलन, माल वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम

Inward slowdown of essential commodities | जीवनावश्यक वस्तूंची आवक मंदावली

जीवनावश्यक वस्तूंची आवक मंदावली

Next

मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मालवाहतूकदारांच्या संपामुळे भुसार मालासह, भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. संप असाच सुरू राहिल्यास, दोन दिवसांत राज्यातील मुंबई-पुणेसह मोठ्या शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवून त्यांचे भाव भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉँग्रेसने या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे मालवाहतूक मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. परिणाम आता राज्यात हळूहळू दिसून येत आहेत. पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भुसार मालाची आवक तब्बल ७० टक्क्यांनी घटली आहे. रविवारी आवक ३० टक्क्यांनी घटली होती.

Web Title: Inward slowdown of essential commodities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.