IPL 2018 - आयपीएलसाठी पुढील पाच वर्षे अतिरिक्त पाणीपुरवठा करणार नाही - मुंबई महापालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 09:43 PM2018-04-06T21:43:01+5:302018-04-06T21:43:01+5:30

आयपीएलच्या सामान्यांदरम्यान वानखेडे स्टेडियमला पुढील पाच वर्षे अतिरिक्त पाणीपुरवठा करणार नाही, असे मुंबई महापालिकेने उच्च  न्यायालयाला शुक्रवारी सांगितले. त्यावर न्यायालयाने महापालिकेला यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले तर राज्य सरकारला सध्याचे जलधोरण सादर करण्याचे निर्देश दिले.

IPL 2018 - Will not provide extra water for next five years for the IPL - Mumbai Municipal Corporation | IPL 2018 - आयपीएलसाठी पुढील पाच वर्षे अतिरिक्त पाणीपुरवठा करणार नाही - मुंबई महापालिका

IPL 2018 - आयपीएलसाठी पुढील पाच वर्षे अतिरिक्त पाणीपुरवठा करणार नाही - मुंबई महापालिका

Next

मुंबई: आयपीएलच्या सामान्यांदरम्यान वानखेडे स्टेडियमला पुढील पाच वर्षे अतिरिक्त पाणीपुरवठा करणार नाही, असे मुंबई महापालिकेने उच्च  न्यायालयाला शुक्रवारी सांगितले. त्यावर न्यायालयाने महापालिकेला यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले तर राज्य सरकारला सध्याचे जलधोरण सादर करण्याचे निर्देश दिले.
शौचालये व कर्मचाऱ्यांना आवश्यक असेल तेवढेच पाणी आयपीएलसाठी देणार की त्याव्यतिरिक्त आणखी पाणीपुरवठा करणार, असा सवाल गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला केला होता. त्यावर उत्तर देताना महापालिकेचे वकील सुरेश पाकळे यांनी शौचालये आणि कर्मचा-यांना वापरासाठी आवश्यक असेल इतकाच पाणीपुरवठा आयपीएल सामन्यांदरम्यान वानखेडे स्टेडियमला करण्यात येणार आहे, अशी माहिती  न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाला दिली. 
त्यावर न्यायालयाने एमसीए यंदा अतिरिक्त पाणीपुरवठ्याची मागणी महापालिकेकडे करणार आहे का, अशी विचारणा एमसीएचे वकील ए. एस. खंडेपारकर यांच्याकडे केली. त्यावर खंडेपारकर यांनी आपल्याला याबाबत सूचना नसल्याचे न्यायालयाला सांगितले.
दरम्याम, बीसीसीआयच्या वकिलांनी राज्याचे जलधोरण दर पाच वर्षांनी बदलत असल्याने सरकारला सध्याचे धोरण न्यायालयात सादर करण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती न्यायालयाला केली.  त्यावर न्यायालयाने राज्य सरकारला सध्याचे जलधोरण सादर करण्याचे निर्देश देत या याचिकेवरील सुनावणी १३ एप्रिल रोजी ठेवली. 
लोकसत्ता मुव्हमेंट यांनी २०१६ मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. त्यावेळी राज्यात दुष्काळ पडला असतानाही आयपीएलच्या सामन्यांसाठी स्टेडियम व खेळपट्टीच्या देखभालीसाठी पाणी पुरवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने या एनजीओने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावेळी न्यायालयाने बीसीसीआयला आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याचा आदेश दिला होता. 

Web Title: IPL 2018 - Will not provide extra water for next five years for the IPL - Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.