मुंबई : राज्य पोलीस दलात कार्यरत असलेले पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांची पदोन्नतीवर राज्य गुन्हा अन्वेषण शाखेत (सीआयडी) बदली करण्यात आली आहे. तर प्रशिक्षण व खास पथकातील विशेष महानिरीक्षक विजयसिंह जाधव यांची महाराष्टÑ गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे. गृह विभागाकडून नुकतेच त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. शशिकांत शिंदे गेल्या वर्षभरापासून पुण्यात अप्पर आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांना विशेष महानिरीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. त्याचबरोबर महाराष्टÑ गुप्तवार्ता विभागाच्या रिक्त असलेल्या संचालक पदावर विजयसिंह जाधव यांची बदली करण्यात आली आहे.
आयपीएस शशिकांत शिंदे पदोन्नतीवर सीआयडीमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 5:18 AM