आयपीएस रश्मी शुक्ला चौकशीसाठी हाजीर हो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:06 AM2021-04-27T04:06:53+5:302021-04-27T04:06:53+5:30

सायबर पोलिसांचे समन्स; ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट भंगप्रकरणी उद्या जबाब नोंदविणार लोकमत सुपर एक्सलिसिव्ह जमीर काझी लोकमत न्यूज नेटवर्क ...

IPS Rashmi Shukla Come for Inquiry! | आयपीएस रश्मी शुक्ला चौकशीसाठी हाजीर हो !

आयपीएस रश्मी शुक्ला चौकशीसाठी हाजीर हो !

Next

सायबर पोलिसांचे समन्स; ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट भंगप्रकरणी उद्या जबाब नोंदविणार

लोकमत सुपर एक्सलिसिव्ह

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या कथित बदल्याचे रॅकेट प्रकरणाचा गोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणी गुन्ह्याबाबत आता तत्कालीन राज्य गुप्त वार्ता विभागाच्या प्रमुख व ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे. मुंबई सायबर पोलिसांनी चौकशीला हजर राहण्यासाठी त्यांना सोमवारी नोटीस पाठविली आहे.

शुक्ला या सध्या प्रतिनियुक्तीवर केंद्रीय राखीव पोलीस दलात अप्पर पोलीस महासंचालक म्हणून हैदराबाद येथे कार्यरत आहेत. त्यांची येत्या बुधवारी चौकशी केली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

अत्यंत गोपनीय समजला जाणारा फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल राज्याचे विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २३ मार्चला पत्रकार परिषदेत जाहीर करून महाविकास आघाडी सरकारचा कारभार भ्रष्ट असल्याचे सांगून टीका केली होती, तर सत्ताधारी नेत्यांनी संबंधित अहवाल पूर्णपणे खोटा असल्याचे सांगत रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप केला होता. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याप्रकरणी तपास करून शुक्ला यांनी अधिकाराचा गैरवापर व सरकारची दिशाभूल करून फोन टॅपिंग करून बनविलेला अहवाल वस्तुस्थितीदर्शक नसल्याचे स्पष्ट केले होते. तो त्यांच्या कार्यालयातून उघड झाल्याचे स्पष्ट करून ऑफिशियल सिक्रेट ॲक्टचा भंग केल्याचेही नमूद केले होते.

राज्य गुप्त वार्ता विभागाच्या वतीने याप्रकरणी २६ जूनला मुंबई सायबर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारींनुसार गोपनीयपत्र व अन्य गोपनीय तांत्रिक माहिती बेकायदेशीरपणे उपलब्ध केल्याप्रकरणी कलम ३० भारतीय टेलिग्राफ ॲक्ट १९८५ सह माहिती-तंत्रज्ञान कायदा २००८ कलम ४३(ब),६६ सह द ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट १९२३च्या कलम ५अनव्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर विभागाचे सहायक आयुक्त एन. के. जाधव या प्रकरणाची चौकशी करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार ते रश्मी शुक्ला यांच्याकडे चौकशी करतील.

* ‘यशोधन’मध्ये होणार चौकशी

रश्मी शुक्ला या अडीच महिन्यांपासून सीआरपीएफमध्ये प्रतिनियुक्तीवर असल्या तरी त्यांचे मुंबईत ‘यशोधन’ या बिल्डिंगमध्ये शासकीय निवासस्थान आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी ११ वाजता त्यांची घरीच चौकशी केली जाणार आहे. अतिवरिष्ठ दर्जाच्या अधिकारी आणि कोविडच्या महामारीमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.

* असे आहे प्रकरण

रश्मी शुक्ला या एसआयडीच्या प्रमुख असताना त्यांनी गेल्यावर्षी जुलैमध्ये सार्वजनिक सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण करू शकतात, या शक्यतेने इंडियन टेलिग्राफ ॲक्ट कलम (२) अन्वये काही व्यक्तींच्या फोन टॅप करण्याची परवानगी घेतली होती. प्रत्यक्षात त्याचा वापर करून अन्य फोन टॅप केले, त्याचा अहवाल २५ ऑगस्टला तत्कालीन पोलीस महासंचालकांना सादर करायचा होता. त्यांनी तो दुसऱ्या दिवशी राज्य सरकारला सादर केला. मात्र त्यामध्ये वस्तुस्थितीदर्शक बाबी नसल्याने तो फेटाळून लावण्यात आला होता. शुक्ला यांनी याबाबत माफी मागितल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. फडणवीस यांनी तोच अहवाल उघड करून गौप्यस्फोट केला होता.

..........................................

Web Title: IPS Rashmi Shukla Come for Inquiry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.