आयपीएसच्या बदल्यांना मुहूर्त मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:15 AM2018-04-28T00:15:34+5:302018-04-28T00:15:34+5:30

पोलीस वर्तुळात अस्वस्थता : अपर महासंचालकांची तब्बल सहा पदे रिक्त

IPS transfers do not get instant! | आयपीएसच्या बदल्यांना मुहूर्त मिळेना!

आयपीएसच्या बदल्यांना मुहूर्त मिळेना!

Next

जमीर काझी ।
मुंबई : एकीकडे सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्या नियमितपणे होत असताना सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आयपीएस अधिकाºयांच्या बढत्या व बदल्यांचा मुहूर्त सातत्याने लांबणीवर पडत आहे. अनेक अधिकाºयांचा कार्यकाळ पूर्ण होऊनही ते त्याच जागी ठाण मांडून आहेत. त्याचप्रमाणे अपर महासंचालकांची तब्बल सहा पदे रिक्त असतानाही त्याचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाºयांकडून चालविला जात आहे. त्यासाठी गृह सचिवांच्या अध्यक्षतेखालील आस्थापना समितीची बैठकही अद्याप घेण्यात आलेली नाही. त्यामुळे बढती व बदलीसाठी पात्र असलेल्या अधिकाºयांत अस्वस्थता आहे.
अपर महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांची स्वेच्छानिवृत्ती चर्चेचा विषय बनला असताना आस्थापना विभागाचे प्रभारी राजेंद्रसिंह आणि प्रशिक्षण व खास पथकाचे प्रमुख एस. जगन्नाथन् हे वर्षभरासाठी बंगळुरूला अभ्यास रजेवर गेले आहेत. गेल्या नोव्हेंबरपासून महत्त्वाच्या पोलीस अधिकाºयांत फेरबदल होणार, अशी चर्चा वर्तुळात रंगली होती. मात्र विविध कारणांमुळे फेरबदल लांबणीवर पडले आहेत. आता सर्वसाधारण बदल्या (जीटी) कालावधी सुरू झाला आहे. त्यामध्ये राज्यातील किमान ३५वर आयपीएस अधिकाºयांच्या बदल्या होणे अपेक्षित आहे. मात्र एप्रिल संपत आला तरी अद्याप बढती व बदलीसाठीची आस्थापना समितीची बैठक घेण्यात आलेली नाही. याबाबत अपर मुख्य सचिव (गृह) सुधीर श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही भाष्य करण्यास नकार दिला.

लोकसभा, विधानसभेसाठी निर्णायक
आयपीएस अधिकाºयांच्या बदल्यांना या वर्षी विशेष महत्त्व आहे. कारण आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका त्यांच्याच अधिपत्याखाली पार पडतील. त्यामुळे निवडणूक कालावधीत आपल्या सोयीच्या ठरणाºया अधिकाºयांची निवड करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्नशील राहील. याच कारणामुळे बदल्या व बढत्यांचा ‘मुहूर्त’ लांबणीवर पडत असल्याची चर्चा आहे.

या अतिवरिष्ठ पदाचा कार्यकाळ पूर्ण
राज्य पोलीस दलातील सर्वांत महत्त्वाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा मुंबई, ठाणे, पुणे या तीनही आयुक्तपदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. ठाण्याचे आयुक्त परमबिरसिंग, मुंबईचे सहआयुक्त देवेन भारती यांना त्या पदावर तीन वर्षे झाली आहेत. तर अमरावतीचे आयजी विनय चौबे, नांदेडचे चिरंजीव प्रसाद, मुंबईतील अपर आयुक्त चेरिग दोरजे, त्यांची पत्नी अस्वती दोरजे, रवींद्र शिसवे, उपायुक्त मनोजकुमार शर्मा, एन. अंबिका, विक्रम देशमाने आदी अधिकाºयांची सध्याच्या पदावर दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. किमान १५ आयपीएस अधिकाºयांचा कार्यकाळ मे, जूनमध्ये संपत आहे.

या अधिकाºयांना प्रतीक्षा
अपर महासंचालक पदासाठी सहआयुक्त अर्चना त्यागी, संजय सक्सेना, मुुख्यालयातील महानिरीक्षक प्रभातकुमार, नवी मुंबईतील सहआयुक्त प्रशांत बुरडे पात्र ठरले आहेत. महानिरीक्षक पदासाठी दोरजे दाम्पत्य, यशस्वी यादव, के. एम. प्रसन्ना, मनोज लोहियांसह आदी सेवा ज्येष्ठतेनुसार बढतीच्या प्रतीक्षेत आहेत.
 

Web Title: IPS transfers do not get instant!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस