इक्बाल मिर्चीची सहाशे कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, लोणावळ्यातील फ्लॅट, बंगल्यांसह कार्यालय सील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 06:04 AM2019-12-12T06:04:01+5:302019-12-12T06:04:40+5:30

१९९३च्या बॉम्बस्फोटातील फरार आरोपी इक्बाल मिर्चीचे २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले आहे.

Iqbal Mirchi seizes assets worth Rs 600 crore; Mumbai, Lonavla flats, office seals with bungalows | इक्बाल मिर्चीची सहाशे कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, लोणावळ्यातील फ्लॅट, बंगल्यांसह कार्यालय सील

इक्बाल मिर्चीची सहाशे कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, लोणावळ्यातील फ्लॅट, बंगल्यांसह कार्यालय सील

googlenewsNext

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा निकटचा साथीदार व मृत गँगस्टर इक्बाल मिर्ची उर्फ मेनन याच्या मालकीच्या मुंबई व लोणावळा येथील फ्लॅट, कार्यालय व बंगले जप्त केले. या मालमत्तेची किंमत सहाशे कोटी रुपये असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. अवैध पद्धतीने संपत्ती जमविल्याप्रकरणी(मनी लॉड्रिंग) ईडीने सोमवारी आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे १,२०० पानी आरोपपत्रामध्ये त्याची पत्नी व दोघा मुलांसह १२ जणांविरुद्ध आरोप ठेवण्यात आले आहेत.

१९९३च्या बॉम्बस्फोटातील फरार आरोपी इक्बाल मिर्चीचे २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याच्या मालकीच्या मुंबईसह देशभरात मिळकती असून, हवालामार्फत त्यातून शेकडो कोटींचे गैरव्यवहार करण्यात आल्याचे ईडीच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. मिर्चीच्या वरळी येथील सीजे हाउस तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील फ्लॅट, ताडदेव येथील अरुण चेंबर्स येथील कार्यालय, वरळीतील साहिल बंगल्यातील तीन फ्लॅट, क्रॉफर्ड मार्केट येथील तीन दुकान, गाळे आणि लोणावळा येथील बंगला व भूखंड जप्त केला आहे. या सर्व मालमत्तेची किंमत अंदाजे ६०० कोटी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ईडीने रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ या दलालांना अटक केली. त्यानंतर, मिर्चीच्या मालमत्तेतील गैरव्यवहारांचा छडा लागला आहे. इक्बाल मिर्ची फरार असताना २०१३ मध्ये त्याचे लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याने १९८६मध्ये मोहम्मद युसूफ ट्रस्टच्या वरळी येथील तीन मालमत्ता साडेसहा लाखांना विकत घेतल्या होत्या.त्याच्या मृत्यूनंतर त्या सुमारे २०० कोटींना विकण्यात आल्या. या व्यवहारामध्ये सन्ब्लिंक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने रणजित सिंग बिंद्रा व हरुण युसूफ याने दलाली केली होती.

Web Title: Iqbal Mirchi seizes assets worth Rs 600 crore; Mumbai, Lonavla flats, office seals with bungalows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.