एक्स्प्रेस वे टोलवसुलीपोटी ‘आयआरबी’ने दिले ६,५०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 02:12 AM2020-06-19T02:12:49+5:302020-06-19T02:13:13+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमएसआरडीसी व राज्य सरकारतर्फे मंत्रालयात रक्कम स्वीकारली

IRB pays Rs 6,500 crore for expressway toll collection | एक्स्प्रेस वे टोलवसुलीपोटी ‘आयआरबी’ने दिले ६,५०० कोटी

एक्स्प्रेस वे टोलवसुलीपोटी ‘आयआरबी’ने दिले ६,५०० कोटी

Next

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलवसुलीच्या अधिकारापोटी ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीने गुरुवारी राज्य सरकारला ६ हजार ५०० कोटींचा पहिला हप्ता प्रदान केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमएसआरडीसी व राज्य सरकारतर्फे मंत्रालयात ही रक्कम स्वीकारली. या समारंभास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे; तर नगरविकास आणि सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक,

एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर, स्टेट बँक आणि युनियन बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पथकरवसुलीसाठी ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनी व एमएसआरडीसीत ८ हजार २६२ कोटींचा करार झाला. त्यानुसार पहिल्या वर्षी आयआरबीकडून सरकारला ६ हजार ५०० कोटी, दुसऱ्या व तिसºया वर्षी प्रत्येकी ८५० कोटी, तसेच चौथ्या वर्षी ६२ कोटी मिळणार आहेत.

Web Title: IRB pays Rs 6,500 crore for expressway toll collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.