‘मामाच्या गावी नेण्या’साठी आयआरसीटीसी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:24 AM2018-03-28T01:24:28+5:302018-03-28T01:24:28+5:30

सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी जाण्यासाठी विविध कुटुंबीयांची लगबग होते

IRCTC ready for 'mama's village' | ‘मामाच्या गावी नेण्या’साठी आयआरसीटीसी सज्ज

‘मामाच्या गावी नेण्या’साठी आयआरसीटीसी सज्ज

Next

मुंबई : सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी जाण्यासाठी विविध कुटुंबीयांची लगबग होते. मात्र, योग्य व परवडणाऱ्या दरात पर्यटन पॅकेज उपलब्ध नसल्यामुळे बहुतांशी नागरिकांचा हिरमोड होतो. हे टाळण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल स्थानकात पर्यटक सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
मुंबई सेंट्रल स्थानकावर नुकतेच पर्यटक सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. आयआरसीटीसीतर्फे विविध पर्यटन स्थळांची माहिती या केंद्रावर उपलब्ध करण्यात आली आहे. यापूर्वी आॅनलाइनवर ही सुविधा उपलब्ध होती. मात्र, आॅनलाइनवर प्रवाशांच्या शंकाचे निरसन होत नसल्याबाबत प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली होती. त्यामुळे प्रवाशांना तपशीलवार माहिती देण्यासाठी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. आवडीच्या ठिकाणी जाणाºयांसाठी ‘आॅन द स्पॉट’ आरक्षण करण्याचीदेखील व्यवस्था या केंद्रावर करण्यात येईल.
मेल-एक्स्प्रेसची माहिती आणि आरक्षण करण्यासाठीदेखील स्वतंत्र खिडकी सुरू करण्यात आली. लवकरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे योग्य ठिकाणी जागा उपलब्ध झाल्यास त्वरित पर्यटन सुविधा केंद्र सुरू करण्यात येईल, अशी माहिती आयआरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरावाला यांनी दिली.

Web Title: IRCTC ready for 'mama's village'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.