माथेरान मिनीट्रेनच्या पर्यटनास ‘आयआरसीटीसी’ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 02:36 AM2018-04-12T02:36:41+5:302018-04-12T02:36:41+5:30

मुंबईकरांचे ‘वन-डे’ पिकनक स्पॉट म्हणून नावाजलेल्या माथेरान मिनीट्रेनच्या लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. पर्यटनपूरक असलेल्या माथेरानमधील मिनीट्रेनचे तिकीट आता लवकरच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

IRCTC ready for the tourism of Matheran Minitrain | माथेरान मिनीट्रेनच्या पर्यटनास ‘आयआरसीटीसी’ सज्ज

माथेरान मिनीट्रेनच्या पर्यटनास ‘आयआरसीटीसी’ सज्ज

googlenewsNext

मुंबई : मुंबईकरांचे ‘वन-डे’ पिकनक स्पॉट म्हणून नावाजलेल्या माथेरान मिनीट्रेनच्या लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. पर्यटनपूरक असलेल्या माथेरानमधील मिनीट्रेनचे तिकीट आता लवकरच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे देशी-विदेशी पर्यटकांना चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटी) संकेतस्थळावरून प्रामुख्याने लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेसची तिकीट विक्री करण्यात येते. त्याचबरोबर, अ‍ॅप बेस टॅक्सीसेवेचेदेखील आरक्षण आणि बुकिंग या संकेतस्थळावरून करता येते. माथेरानमधील पर्यटनवृद्धीसाठी आणि देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आयआरसीटीसीने संकेतस्थळावर तिकीट विक्री करण्याची तयारी दर्शविली आहे. लवकरच माथेरान मिनीट्रेनचे तिकीट संकेतस्थळावर मिळेल, अशी घोषणा मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय कुमार जैन यांनी केली.
दरम्यान, सध्या माथेरान मिनीट्रेन तिकीट संकेतस्थळावरून सुरू असल्याची चर्चा आहे. संकेतस्थळावरील आयआरसीटीसी पर्यटन या गटात माथेरान मिनीट्रेनचे तिकीट उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही योजना पर्यटनपूरक असली, तरी अद्याप या योजनेला सुरू होण्यास वेळ असल्याची माहिती आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
...त्यानंतरच जोडणार वाफेचे इंजिन
माथेरान मिनीट्रेनला हेरिटेज लूक देण्यासाठी वाफेवर चालणारे इंजिन जोडण्यात येणार आहे. वाफेच्या इंजिनसह मिनीट्रेन चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी
यशस्वी झाल्यानंतर वाफेचे इंजिन जोडायचे की नाही, यावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जैन यांनी दिली.
>अशी असेल सुविधा
माथेरान प्रकल्पासाठी जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सची सल्लागारपदी नियुक्ती
मिनीट्रेनमधील दोन बोगीत रेस्टॉरंट सुरू करण्याचे नियोजन, स्थानिक
खाद्यपदार्थांना प्राधान्य, मिनीट्रेनच्या
दुतर्फा घनदाट झाडे लावणार
माथेरान स्थानकाजवळ फूडप्लाझा आणि मनोरंजन ठिकाण विकसित करणार

Web Title: IRCTC ready for the tourism of Matheran Minitrain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.