मुंबई : वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईक यांच्या बंदी घातलेल्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे (आयआरएफ) प्रवक्ते मंजूर शेख (८३) यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आयआरएफकडून सांगण्यात येत आहे.गेल्या २१ वर्षांपासून ते झाकीर नाईक यांच्यासोबत काम करीत होते. शेख हे कुटुंबासोबत कल्याण येथे राहायचे. व्यवसायाने इंजिनीअर असलेले शेख निवृत्तीनंतर आयआरएफ संस्थेशी जोडले गेले. त्यानंतर ते नाईक यांचे विश्वासू साथीदार बनले होते.शेख यांनी आयआरएफचे संचालक आणि मुख्य प्रवक्ता म्हणून काम बघितले. नाईक यांच्या वादग्रस्त भाषणांबाबत, तसेच संस्थेला होणारे फंडिंग आणि आर्थिक व्यवहारांबाबत एनआयएच्या अधिकाऱ्यांनी शेख यांच्याकडे कसून चौकशी केली. मरिन लाइन्स येथील बडा कबरस्तान येथे त्यांचा दफनविधी पार पाडण्यात आला. (प्रतिनिधी)
आयआरएफचे प्रवक्ते मंजूर शेख यांचे निधन
By admin | Published: December 24, 2016 10:46 PM