63 व्या जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान खान, विद्या बालनची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 05:36 AM2018-01-21T05:36:55+5:302018-01-21T14:19:29+5:30

बॉलिवूडमधील प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक म्हणजे 63 वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा शनिवारी रात्री पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट म्हणून अभिनेता इरफान खान आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून विद्या बालन यांनी बाजी मारली.

Irfan Khan, Vidya Balan's bet on the Geo Filmfare Awards ceremony | 63 व्या जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान खान, विद्या बालनची बाजी

63 व्या जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान खान, विद्या बालनची बाजी

googlenewsNext

मुंबई : बॉलिवूडमधील प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक म्हणजे 63 वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा शनिवारी रात्री पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट म्हणून अभिनेता इरफान खान आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून विद्या बालन यांनी बाजी मारली. तर, सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) राजकुमार राव आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) झायरा वसीम यांनी मोहोर उमटवली. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा मुंबईतील गोरेगाव येथील एनएससीआय, एसव्हीपी स्टेडियमवर रंगला होता. यावेळी अनेक बॉलिवूडमधील दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती.  

पुरस्कार विजेते खालील प्रमाणे - 
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका) : इरफान खान, हिंदी मिडिअम
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) : विद्या बालन, तुम्हारी सुलु  
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : राजकुमार राव, ट्रॅप्ड
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : झायरा वसीम, सिक्रेट सुपरस्टार 
 - सर्वाधिक चित्रपट (लोकप्रिय): हिंदी मिडिअम 
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकः अश्विनी अय्यर तिवारी (बरेली की बर्फी)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) : कोंकणा सेन शर्मा (अ डेथ इन द गंज)  
-सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : राजकुमार राव (बरेली की बर्फी) 
- सर्वोत्कृष्ट कथा : अमित मसुरकर (न्यूटन) 
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : मेहेर विज (सिक्रेट सुपरस्टार) 
- सर्वोत्कृष्ट संवाद : हितेश कैवल्य (शुभ मंगल सावधान) 
- सर्वोत्कृष्ट पटकथा : शुभाशिष भुतियानी (मुक्ती भवन) 
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मेघना मिश्रा (नचदी फेरा - सिनेमा सिक्रेट सुपरस्टार)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंह (रोके रुके ना नैना - बद्रीनाथ की दुल्हनिया) 
- सर्वोत्कृष्ट गीत : अमिताभ भट्टाचार्य (उल्लू का पठ्ठा - सिनेमा जग्गा जासूस) 



















 

Web Title: Irfan Khan, Vidya Balan's bet on the Geo Filmfare Awards ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.