मलजल वाहिनीवरील लोखंडी अच्छादन निखळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:06 AM2021-06-28T04:06:47+5:302021-06-28T04:06:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर पवईलगत मलजल वाहिनीचे लोखंडी अच्छादन निखळल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर पवईलगत मलजल वाहिनीचे लोखंडी अच्छादन निखळल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. रात्रीच्या वेळी हा प्रकार वाहनचालकांच्या निदर्शनास येत नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
पवई विहार संकुल बसस्थानकाजवळ मलजल वाहिनीचे लोखंडी अच्छादन निखळून सरकले आहे. शिवाय बाजूचा रस्ताही खचल्याने खड्ड्याप्रमाणे पोकळी तयार झाली आहे. त्याच्याच शेजारी असलेल्या एका भूमिगत टाकीचे अच्छादनही उखडल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. जेव्हीएलआर रोडवरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. अशावेळी वाहन चालकांना लांबून हा प्रकार निदर्शनास येत नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. रात्रीच्या वेळी तर दुचाकीस्वारांना हा रस्ता पार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संभाव्य धोका ओळखून या पोकळीवर प्लास्टिक गर्डर उभा केला आहे. परंतु, ही तात्पुरती सोय असून तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.