पारोळ : वसई पुर्व भागातील चांदीप शाळेतील मुलांना सुट्टी झाल्यावर वेळेवर बस मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्याचप्रमाणे मुलींना घरी जाण्यासाठी उशीर होत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत आहे.चांदीप या शाळेमध्ये मेढे, कळंभोण, भिनार, तिल्हेर, आडणे, करंजोण, देपीवली, माजीवली या मुख्य रस्त्यापासून लांब असलेल्या गावातील मुले-मुली शिक्षण घेतात. शाळेची संध्याकाळी सुट्टी झाल्यानतर एस.टी ची बस वेळेवर मिळत नसल्यामुळे व काही एस.टी बसचे चालक एस.टी बस शाळेजवळ थांबवत नसल्यामुळे या गावातील मुलांना घरी जाताना अंधार पडतो. त्याचप्रमाणे तिल्हेरकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पारोळ फाट्यावर व मेढे येथे जाणाऱ्या मुलांना मेढे फाट्यावर उतरून पुढे जावे लागते. पण बस वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांना या ठिकाणी यायला उशीर झाल्याने या दोन फाट्यावरील रिक्षा बंद होतात. मग विद्यार्थ्यांना पायी प्रवास करण्याची वेळ येते.पर्यायी एस.टी सुविधा करावी अशी मागणी होत आहे
अनियमित एसटीने शालेय विद्यार्थ्यांचे हाल
By admin | Published: September 11, 2014 12:20 AM