वातानुकूलित आणि प्रथम श्रेणी डब्यातील अनियमित प्रवासाला आळा बसणार

By सचिन लुंगसे | Published: May 25, 2024 06:10 PM2024-05-25T18:10:36+5:302024-05-25T18:11:41+5:30

प्रवाशांना तक्रार करण्यासाठी ७२०८८१९९८७ हा व्हॉट्सॲप क्रमांक  

Irregular travel in air-conditioned and first-class coaches will be curbed | वातानुकूलित आणि प्रथम श्रेणी डब्यातील अनियमित प्रवासाला आळा बसणार

वातानुकूलित आणि प्रथम श्रेणी डब्यातील अनियमित प्रवासाला आळा बसणार

मुंबई: उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या वातानुकूलित आणि प्रथम श्रेणी डब्यातील अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने एसी टास्क फोर्स सुरू केला असून, प्रवाशांना तक्रार करण्यासाठी ७२०८८१९९८७ हा व्हॉट्सॲप क्रमांक देण्यात आला आहे. शिवाय वातानुकूलित लोकल / प्रथम श्रेणी डब्यांमधील अनियमित प्रवासाच्या समस्यांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्या सोडविण्यासाठी एक विशेष मॉनिटरिंग टीमही तयार करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यातून अंदाजे १८१० सेवांद्वारे दररोज ३.३ दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वे दररोज ६६ वातानुकूलित लोकल सेवा चालवते. ज्यातून दररोज अंदाजे ७८,३२७ प्रवासी करतात. वातानुकूलित लोकलच्या प्रवासातील सुरक्षितता आणि आरामाचा फायदा पाहता वातानुकूलित लोकल सेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. प्रवासाचा अनुभव वाढवण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयी सुनिश्चित करण्यासाठी उपाय म्हणून, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने उपनगरीय गाड्यांमधील वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये अनियमित प्रवास करण्याच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी टास्क फोर्स सुरू केला आहे.
 
वातानुकूलित लोकल / प्रथम श्रेणी डब्यांमधील अनियमित प्रवासाशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे. त्वरित मदत देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ज्या प्रकरणांमध्ये तात्काळ मदत करणे शक्य नाही, त्या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी दुसऱ्या दिवशी तपासणी केली जाणार आहे.

Web Title: Irregular travel in air-conditioned and first-class coaches will be curbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.