Join us

‘आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 5:30 AM

२८ फेब्रुवारीला सार्वजनिक आरोग्य विभागातील क श्रेणीतील ५४ संवर्गातील पदभरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत काही ठिकाणी पेपर फुटल्याची तर काही केंद्रांवर डमी विद्यार्थी,  तर काही केंद्रावर प्रश्नपत्रिका उशीरा पोहचल्याचा विषय आमदार विनायक मेटे यांनी अल्पकालीन चर्चेद्वारे उपस्थित केला होता.

ठळक मुद्दे२८ फेब्रुवारीला सार्वजनिक आरोग्य विभागातील क श्रेणीतील ५४ संवर्गातील पदभरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत काही ठिकाणी पेपर फुटल्याची तर काही केंद्रांवर डमी विद्यार्थी,  तर काही केंद्रावर प्रश्नपत्रिका उशीरा पोहचल्याचा विषय आमदार विनायक मेटे यांनी अल्पकालीन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने अलीकडेच घेतलेल्या परीक्षेत काही गैरप्रकार झाल्याचे मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी विधान परिषदेत मान्य केले. त्यामुळे ५४ संवर्गापैकी सुतार पदासाठी फेरपरीक्षा घेतली जाईल. तर, चौकशी पूर्ण होईपर्यंत आरोग्यसेवक आणि वाहनचालक पदासाठीचे निकाल राखून ठेवण्यात येईल. मात्र, अन्य संवर्गाची फेरपरीक्षा घेण्याची आवश्यकता नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.

२८ फेब्रुवारीला सार्वजनिक आरोग्य विभागातील क श्रेणीतील ५४ संवर्गातील पदभरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत काही ठिकाणी पेपर फुटल्याची तर काही केंद्रांवर डमी विद्यार्थी,  तर काही केंद्रावर प्रश्नपत्रिका उशीरा पोहचल्याचा विषय आमदार विनायक मेटे यांनी अल्पकालीन चर्चेद्वारे उपस्थित केला होता. यावर, काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे मंत्री टोपे यांनी मान्य केले. या परीक्षांसाठी २ लाख ३६ हजार विद्यार्थ्यांनी हॉलतिकीट डाऊनलोड केले होते. तर, १ लाख ३३ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. ३२ जिल्ह्यातील ८२९ केंद्रांवर परीक्षा झाली. यापैकी औरंगाबाद येथे प्रश्नपत्रिकेच्या गाड्या उशीरा पोहचल्या. मात्र, प्रश्नपत्रिका फुटल्याची तक्रार आली नाही. आरोग्यसेवक आणि वाहनचालक या संवर्ग परीक्षेचे काही प्रश्न काही उमेदवारांपर्यंत पोहोचल्याचा संशय आहे. यासंदर्भात पोलीस चौकशी सुरू असून सायबर विभागही यासंदर्भात तपास करत आहे. हा तपास पूर्ण होईपर्यंत निकाल राखून ठेवण्यात येईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :राजेश टोपेपरीक्षा