Join us

वाडिया रुग्णालयाच्या कारभारात अनियमितता; मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 6:16 PM

पालिका प्रशासनावर भाजपाने गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई : वाडिया रुग्णालयाची देणी मुंबई महापालिकेने थकविल्याने रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. आर्थिक अडचणींमुळे रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना डिस्चार्ज दिला, तसेच पुढील शस्त्रक्रियाही अचानक रद्द केल्या. याचा फटका गोरगरीब रुग्णांना बसला आहे. यावरून यामागे पालिका प्रशासनाचा हात असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. 

या सगळ्या वादावर पालिकेकडून प्रथमच खुलासा आला आहे. वाडिया रुग्णालयाच्या प्राथमिक चौकशीत कारभारात अनियमितता आढळून आली आहे. यामध्ये अतिरिक्त कामगार भरती, दुबार वेतन, मानधन, पालिकेची परवानगी न घेता वाढविण्यात आलेले अतिरिक्त बेड असे प्रकार समोर आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी दिली आहे. 

'वाडिया'ची मोक्याची जागा हडपण्याचं षड्यंत्र?; शेलारांचा शिवसेनेवर वार

वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर; निधीअभावी शस्त्रक्रिया रद्द, 300 रुग्णांना डिस्चार्ज

याबाबत निर्णय घेण्यासाठी महापौर, पालिका प्रशासन आणि रूग्णालय प्रशासनामध्ये बैठक होणार आहे. डिया ट्रस्टने आपली बाजू ठेवल्यानंतर पुढील कारवाई बाबत निर्णय होईल, असेही काकाणी यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाहॉस्पिटल