अभिनेता इरफान खानकडून आजाराबाबत खुलासा, न्युरो इंडोक्राइन ट्युमरने ग्रासलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 03:34 PM2018-03-16T15:34:58+5:302018-03-16T18:25:57+5:30

एक स्टेटमेंट जारी करून इरफानने आजारीविषयी माहिती दिली.

Irrfan Khan: I have been diagnosed with Neuroendocrine Tumour | अभिनेता इरफान खानकडून आजाराबाबत खुलासा, न्युरो इंडोक्राइन ट्युमरने ग्रासलं

अभिनेता इरफान खानकडून आजाराबाबत खुलासा, न्युरो इंडोक्राइन ट्युमरने ग्रासलं

Next

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेचा इरफान खानला झालेल्या आजाराबद्दल चर्चा आहे. या चर्चांना अभिनेता इरफान खानने पूर्णविराम दिला आहे. ट्विटरवर एक पोस्ट करून  इरफानने आजारीविषयी माहिती दिली. न्युरो इंडोक्राइन ट्युमर नावाचा आजार इरफानला झाला असून उपचारासाठी तो लवकरच परदेशात जाणार आहे. न्युरो इंडोक्राइन ट्युमर म्हणजे मज्जासंस्था आणि हार्मोन्स यांच्या पेशींमधून गाठ तयार होते. याच आजाराने इरफानला ग्रासलं आहे. 

'अनपेक्षित घटना आपल्याला मोठं व्हायला मदत करतात. गेले काही दिवस हिच स्थिती होती. न्युरो इंडोक्राइन ट्युमर झाल्याचं माहिती होणं हे माझ्यासाठीही तितकंच कठीण होतं. पण आमच्या आजुबाजुला असणाऱ्यांचं प्रेम व मला मिळालेलं प्रोत्साहन या सगळ्यातून मला आशेचं नवं किरणं दिसलं. या आजारवर उपचार करण्यासाठी मला परदेशात जावं लागणार आहे. पण तुमच्या शुभेच्छा अशाच सुरू ठेवा. आपल्या आजारपणाविषयी पसरणाऱ्या अफवांविषयीसुद्धा त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. न्यूरो म्हणजे नेहमीच मेंदूचा आजार नसतो. याविषयी अचूक माहिती आणि ‘संशोधन’ करायचं असल्यास गुगलची मदत घ्या.  इरफानने हे ट्विट करत आपण लवकरच बरं होऊन परत येण्याची आशा करत असल्याचंही चाहत्यांना सांगितलं आहे.

 

अशी पोस्ट इरफानने त्याच्या ट्विटर हॅण्डलवरून केली आहे. 


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता इरफान खानला एका गंभीर आजारानं पछाडलं असल्याचं समोर आलं होतं.  गेल्या अनेक दिवसांपासून तो काहीसा अज्ञातवासात होता.इरफानने ट्विट करत म्हटलं आहे की, कधी कधी तुम्हाला असे झटके बसतात ज्याने तुमच्या आयुष्यात मोठ्या उलथापालथी होतात. माझ्या आयुष्यातील मागील 15 दिवस हे एका सस्पेंस स्टोरीसारखे राहिले आहेत. मला हे माहिती नव्हतं की दुर्मीळ गोष्टींचा माझा शोध मला एका दुर्मीळ आजारापर्यंत नेईल, असं कधीच वाटलं नव्हतं. मी कधीच पराभव स्वीकारलेला नाही. नेहमीच स्वतःच्या आवडीसाठी मी लढत राहिलोय आणि कायम लढा देत राहणार आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र परिवार माझ्यासोबत आहेत. आम्ही सगळे जण या आजाराशी चांगल्या पद्धतीनं निपटण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत तुम्ही काहीही अंदाज वर्तवू नका. येत्या 8 ते 10 दिवसांत रिपोर्ट्स येतील तेव्हा मी स्वत: माझ्या आजाराबाबत तुम्हाला कल्पना देईन, तोपर्यंत माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, असं त्याने म्हंटलं होतं. 

 

Web Title: Irrfan Khan: I have been diagnosed with Neuroendocrine Tumour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.