कोथुर्डे धरणाच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

By admin | Published: March 22, 2015 10:28 PM2015-03-22T22:28:15+5:302015-03-22T22:28:15+5:30

शहरासह परिसरातील १९ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

Irrigation of Irrigation Department in Kothurde dam repair | कोथुर्डे धरणाच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोथुर्डे धरणाच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

Next

महाड : शहरासह परिसरातील १९ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पावसाळ्यापूर्वी या धरणाची दुरुस्ती न केल्यास या धरणाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
चाळीस वर्षांपूर्वी बांधलेले हे धरण मातीचे असून गेल्यावर्षी ऐन पावसाळ्यात २४ जुलैला या धरणाच्या भिंतीला मोठे भगदाड पडले होते, मात्र युद्धपातळीवरून केलेल्या डागडुजीमुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात सुरू झालेली गळती थांबविण्यात यश आलेले होते. या धरणाच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ९६ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव ठाणे येथील पाटबंधारे कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला होता. मूळ डिझाईनमध्ये पाइपलाइन आरसीसी असल्याचे सांगत हा प्रस्ताव आरसीसी पाइनलाइनचा अंतर्भाव करून पुन्हा पाठवण्याच्या सूचना रायगड पाटबंधारे विभागाकडे पाठविला आहे.
पावसाळ्यापूर्वी धरणाच्या भिंतीचे त्याचप्रमाणे अन्य दुरुस्तीची कामे पूर्ण झाली नाहीत, तर पावसाळ्यात या धरणाचा असलेला धोका गतवर्षीच्या तुलनेत अधिक वाढणार असल्याचे रायगड पाटबंधारेच्या एका अभियंत्याने सांगितले. हे धरण मातीचे असल्यामुळे धरण फुटल्यास निर्माण होणारी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका संभवत आहे. महाडचे तहसीलदार संदीप कदम यांनी २४ जुलै २०१४ च्या घटनेनंतर संबंधित विभागाला लेखी पत्र दिलेले होते. महाड नगरपरिषदेनेही या धरणाची दुरुस्ती जून २०१५ पूर्वी करण्याबाबत पाटबंधारे विभागाला कळवले होते, तसेच जलसंपदा राज्यमंत्र्यांनीही दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याचे आदेश दिले होते, मात्र तरीही संबंधित विभागामार्फत या दुरुस्तीच्या कामात वेळकाढूपणा होत असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)

धरणाचे काम रखडलेले
४रायगड पाटबंधारे विभागाने कोथुर्डे धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव श्रीवर्धन येथील कुडकी लघुपाटबंधारे योजनेच्या धर्तीवरच तयार करण्यात आलेला होता. कुडकी धरणाच्या दुरुस्तीचे काम मंजूर होऊन ते पूर्ण देखील झाले मात्र धरणाच्या कामाला अद्याप मंजुरीही मिळालेली नाही.

Web Title: Irrigation of Irrigation Department in Kothurde dam repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.