Join us

इंडिया आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण आहे? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 4:49 PM

देशभरातील ३५ हून अधिक विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजप विरोधात आघाडी केली आहे.

मुंबई-  देशभरातील ३५ हून अधिक विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजप विरोधात आघाडी केली आहे. या आघाडीला इंडिया असं नाव देण्यात आले आहे. या आघाडीची पहिली बैठक बिहारमध्ये झाली तर दुसरी बैठक बंगळूरमध्ये झाली. आता तिसरी बैठक मुंबईत होणार आहे, ही बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणार असून देशातील विरोधी पक्षांचे नेते मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे. या बैठीत अनेक नवे पक्ष सामील होमार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीही बैठकीत सहभाग घेणार असल्याचे बोलले जात आहे. या चर्चांवर वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रीया दिली आहे. 

१६ ऑक्टोबरपर्यंत राजकीय स्टेटमेंट करणार नाही; बच्चू कडूंची भूमिका, काय आहे कारण?

प्रकाश आंबेडकर म्हणाले, इंडिया आघाडीचे आम्हाला निमंत्रण नाही. आम्ही ठाकरे गटासोबत आहोत, पण महाविकास आघाडीसोबत नाही. आम्हाला बैठकीचे निमंत्रण का दिलं नाही याचे कारण काँग्रेसला विचारले पाहिजे, काँग्रेस आम्हाला निमंत्रण देत नाही, असंही आंबेडकर म्हणाले. 

इंडियाच्या बैठकीमध्ये हजेरी लावणार नसल्याचे स्पष्टीकरण आंबेडकर यांनी दिलं आहे. पण राज्यातील महाविकास आघाडीमध्ये आपण नसून आम्ही फक्त ठाकरे गटासोबत युती केली असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

दोन दिवसाच्या होणाऱ्या बैठकीसाठी देशातील नेते मुंबईत दाखल होणार आहेत. शेकापचे आमदार जयंत पाटील हे सुद्धा या बैठकीमध्ये सामील होणार आहेत. ही बैठक महत्वपूर्ण होणार आहे, यात अनेक मोठे निर्णय होणार आहेत. 

'INDIA आघाडीमुळे भाजप घाबरली'

 

इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजपकडून होत असलेली टीका हास्यास्पद आहे. देशभरातील २८ पक्ष मोदी सरकार विरोधात एकत्र आले आहेत, बंगलुरुमध्ये इंडिया आघाडीची दुसरी बैठक होत असतानाच नरेंद्र मोदी यांनी  घाईघाईने एनडीएची बैठक बोलावली. इंडिया आघाडीची ताकद पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप घाबरलेले आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

मीडियाशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात ६२ टक्के लोकांनी मतदान केले होते. यावेळी मतांचे विभाजन होऊ द्यायचे नाही असे विरोधी पक्षांनी निश्चित केले आहे. इंडिया आघाडी भक्कमपणे उभी आहे म्हणून भाजपाकडून मतविभाजन व्हावे यासाठी BRS सारख्या पक्षांना पुढे केले जात आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

टॅग्स :इंडिया आघाडीप्रकाश आंबेडकरशिवसेना