जवळची माणसेच करतात घात; तुमचा पाल्य सुरक्षित आहे का?; पोलिस हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 10:04 AM2023-11-14T10:04:53+5:302023-11-14T10:05:09+5:30

सप्टेंबरपर्यंत महिलांवरील अत्याचाराचे ४ हजार ४०३ गुन्हे नोंद झाले आहेत.

Is your child safe?; An appeal to contact the police helpline | जवळची माणसेच करतात घात; तुमचा पाल्य सुरक्षित आहे का?; पोलिस हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन

जवळची माणसेच करतात घात; तुमचा पाल्य सुरक्षित आहे का?; पोलिस हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन

मुंबई : गेल्या नऊ महिन्यांत ४४२ अल्पवयीन मुली विकृत वासनेच्या शिकार ठरल्या आहेत, तर ८७६ मुलींच्या अपहरणाची नोंद पोलिस दप्तरी करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक गुन्हे हे जवळच्या आणि ओळखीच्या व्यक्तींकडून होत असल्याचे समोर येत आहे.

मुंबईपोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरपर्यंत महिलांवरील अत्याचाराचे ४ हजार ४०३ गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी ३ हजार ९७४ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे. २०२२ मध्ये या नऊ महिन्यात ४ हजार ६३७ गुन्ह्यांची नोंद पोलिस दप्तरी झाली, तर ३ हजार ५११ गुन्ह्यांची उकल करण्यात आली. लॉकडाऊनच्या कालावधीत महिलांवरील अत्याचार, चोरी, घरफोडी, हत्या, खंडणी या गुन्ह्यांचे प्रमाण घटले होते.

अन् विकृतीच्या जाळ्यात अडकला...

रागाने घर सोडणे चेंबूरमधील अल्पवयीन मुलाला महागात पडले. वाटेत एकाची नजर त्याच्यावर पडली आणि त्याच्या विकृत वासनेचा तो शिकार झाल्याची घटना चेंबूरमध्ये घडली आहे. मुलाला विविध ठिकाणी नेत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले आहे.  धक्कादायक बाब म्हणजे चार महिन्यात तीन वेळा अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

निर्भया पथकाची रचना काय ?

महिलांच्या सुरक्षेसाठी १४ सप्टेंबर रोजी या पथकाची स्थापना केली. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या मोबाइल पाच गस्त वाहनास ‘निर्भया पथक’ असे संबोधण्यात आले. हे निर्भया पथक सध्या मुंबईच्या कोनाकोपऱ्यात पोहोचत महिलांना मार्गदर्शन करताना दिसत आहे, तर कुठे कॉर्नर मीटिंग, कार्यशाळेदरम्यान स्त्रियांना स्वसंरक्षणाची माहिती, तसेच मदतीसाठी तत्काळ पोलिस हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दर दोन दिवसांत एका गुन्हा

लॉकडाऊनचे सुरुवातीचे काही दिवस सोडले, तर मुख्यत्वेकरून एप्रिल आणि मे महिन्यांत शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली. शहरात दिवसाला दाखल होणाऱ्या बलात्काराच्या सरासरी तीन गुन्ह्यांचे प्रमाण घटून दर दोन दिवसांत एका गुन्ह्यावर आले होते. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा अर्ध्यावर असला, तरी जूननंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे स्वरुपात आली.

जवळच्या व्यक्तीकडून अत्याचार
जवळच्या व्यक्तींकडूनच सर्वाधिक अत्याचार होत असल्याचे पोलिस दप्तरी नोंद होत असल्याच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. 

Web Title: Is your child safe?; An appeal to contact the police helpline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.