इशिकाने केलं देशाचं प्रतिनिधित्व, 'रोप स्किपिंग' आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 06:21 PM2021-10-17T18:21:47+5:302021-10-17T18:25:19+5:30
इशिका ही 12वी इयत्तेत शिकत असून या अगोदर तिने गोल्ड मेडल जुडो मध्ये तसेच रोप स्कीपिंग मध्ये पारितोषिक मिळवून मुंबई व महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावले आहे.
मुंबई - 'अमातूर ऍथेलॅटिक युनियन आणि आंतरराष्ट्रीय रोप स्किपिंग संघटना ऑगस्ट २०२१ ' सदर स्पर्धेत ललित कला भवन, नायगाव, दादर (पूर्व) येथे नुकतीच ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत १८ वर्षांवरील वयोगटात इशिका शैलेंद्र तावडे हिने भारताकडून प्रतिनिधित्व करताना ३० सेकंद स्पीड या प्रकारात द्वितीय क्रमांक व ३ मिनिटे इंडोरन्स या प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला. या जागतिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रत्येकी १७ देशातून एकूण ४५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामधून इशिका हिने भारताकडून चांगली कामगिरी करत देशाचे नाव उंचावले आहे.
इशिका ही 12वी इयत्तेत शिकत असून या अगोदर तिने गोल्ड मेडल जुडोमध्ये तसेच रोप स्कीपिंगमध्ये (दोरीच्या उड्या) पारितोषिक मिळवून मुंबई व महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावले आहे. मॉडेल टाऊन,अंधेरी पश्चिम येथे राहत असून पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र (बाळा) आंबेरकर, माजी शाखाप्रमुख अनिल राऊत यांनी तिच्या घरी जाऊन तीचा सत्कार करून पालकांचे अभिनंदन केले. इशिका ही प्रशिक्षक राजेश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असून ती सात बंगला, मॉडेल टाऊन, अंधेरी (प.) येथे वास्तव्यास आहे. इशिका ही 'जानकी देवी पब्लिक स्कूल-अंधेरी' येथे शिक्षण घेत असून तिने या आकर्षक कामगिरीमुळे देशासोबत आपल्या शाळेचेही नाव उंचावले आहे. आई अनुष्का व वडील शैलेंद्र तावडे यांनी विशेष मेहनत आपल्या मुलीला या शिखरावर घेऊन जाण्यासाठी घेतली आहे.