तुमच्या मुलाची शाळा बोगस तर नाही ना? मुंबईत शेकडो शाळा आहेत बोगस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 10:05 AM2023-04-15T10:05:07+5:302023-04-15T10:05:23+5:30

मुंबई : राज्यातील बेकायदा शाळांची यादी शिक्षण आयुक्तांनी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत नवी मुंबईतील बेकायदा शाळांचाही समावेश ...

Isnt your child's school bogus There are hundreds of bogus schools in Mumbai | तुमच्या मुलाची शाळा बोगस तर नाही ना? मुंबईत शेकडो शाळा आहेत बोगस

तुमच्या मुलाची शाळा बोगस तर नाही ना? मुंबईत शेकडो शाळा आहेत बोगस

googlenewsNext

मुंबई :

राज्यातील बेकायदा शाळांची यादी शिक्षण आयुक्तांनी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत नवी मुंबईतील बेकायदा शाळांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून अशा शाळांचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याने लवकरच शहरातील बेकायदा शाळांची माहिती समोर येणार आहे.

मुंबईत गेल्या काही वर्षांत शाळांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातही सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळा दरवर्षी वाढत आहेत. मोठमोठ्या शाळा, कॅम्पस त्यातील अनेक सुविधा उपलब्ध आहेत. असे असले तरी अनेक शाळांचा कारभार बेकायदा हाकला जात असल्याचे प्रकार दरवर्षी समोर येतात.

राज्यभरात ८०० शाळा बेकायदा
राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी राज्यात ८०० शाळा बेकायदा सुरू असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, नवी मुंबईतील शाळांचा यात समावेश असण्याची शक्यता आहे. 

विद्यार्थ्यांचे समायोजन करणार
राज्य सरकार बोगस शाळांवर कारवाई करणार आहे. त्यावेळी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. बोगस शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत करावे लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत याबाबत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

२६९ शाळा बेकायदा
शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. मात्र शिक्षणाच्या नावाखाली मुंबईत बेकायदा शाळा व्यवस्थापकांनी शैक्षणिक बाजार मांडला आहे. मुंबईत दहा, वीस नव्हे तर तब्बल २६९ शाळा बेकायदा आहेत. पुण्यातील ४३ शाळांच्या तुलनेत ही संख्या मोठी आहे. या शाळांच्या व्यवस्थापनाने आपली दुकाने थाटून मोठी कमाई सुरू केली आहे.

पालिका प्रशासनाकडून फक्त नोटीस
शाळांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार राज्य सरकारकडे असल्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कोणत्याच प्रकारची कारवाई या शाळांवर करता येत नाही. महापालिका प्रशासन फक्त या शाळांना नोटीसच देऊ शकते.

Web Title: Isnt your child's school bogus There are hundreds of bogus schools in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.