लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामकाजाला आयएसओ ९००० आणि आयएसओ २७००१ ने प्रमाणित प्रदूषण नियंत्रणाकरिता कामकाज करणाऱ्या व संपूर्ण संगणकीकरणाच्या माध्यमातून मंडळाच्या कामकाजात सुधारणा करणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आयएसओ या संस्थेने आयएसओ ९००० : २०१५ ने प्रमाणित करण्यात आले.
संगणकीकरणाच्या माध्यमातून औद्योगिक आस्थापनांना सेवा देण्याच्या उद्देशाने मंडळाचे बहुतांशी कामकाज ऑनलाइन केले जाते. या कामकाज पद्धतीची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आयएसओकडे सादर करण्यात आलेल्या कामकाज पद्धतीला मानांकन मिळाले आहे. विविध सेवांसाठी मंडळाचे तांत्रिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असे डाटा सेंटर चालवले जाते. या सेंटरच्या सुरक्षा आणि राज्यभरातील कार्यप्रणालीस आयएसओने २७००१ : १३ याने प्रमाणित केले आहे. आयएसओकडून मिळालेल्या या दोनही नामांकनामुळे सेवा गतिशील राबविणे शक्य होणार आहे. याकरिता मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे तांत्रिक सचिव पुंडलिक मिराशे, सांख्यिकी अधिकारी दिनेश सोनावणे व मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
......................................