Join us

'मोदी-शहांच्या प्रचारातून विकासाचा मुद्दा गायब'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 5:49 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि अन्य नेत्यांच्या भाषणांमधून विकासाचा मुद्दा गायब झाला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि अन्य नेत्यांच्या भाषणांमधून विकासाचा मुद्दा गायब झाला असून, ते घृणास्पद भाषा वापरत आहेत, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते खा. अभिषेक मनू संघवी यांनी गुरुवारी केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संघवी म्हणाले, ‘अली आणि बजरंग बली’ असा घृणास्पद प्रचार भाजपा करीत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विषयी अपशब्द, सेना-जवान, नमो टीव्ही, बायोपिक अशा गोष्टींबाबत बोलून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.संघवी म्हणाले की, रोजगार, कृषी, विकास, आर्थिक अर्थव्यवस्था, शेतकरी या मूळ गोष्टींवर नरेंद्र मोदी बोलत नाहीत. कोणतेही खरे आकडे जनतेसमोर सादर करत नाही आहेत. नोटबंदी आणि जीएसटी मुळे देशात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. देशाची अर्थव्यवस्था संपूर्णत: कोलमडलेली आहे. बीजेपी म्हणजे बेरोजगार जमाव पार्टी झालेली आह. नवीन गुंतवणूक नाही, कृषी उद्योग- औद्योगिक वाढ नाही, रुपया घसरलेला आहे. व्यापार आणि उद्योग धंदे बुडाले आहेत. शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. सर्वच क्षेत्रात आपण मागे पडलो असल्याचे संघवी यांनी सांगितले.>‘रिक्त पदे भरू’बेरोजगारी वाढलेली असताना केंद्र सरकार आणि राज्यसरकार मधील २२ लाख सरकारी नोकऱ्यांची रिक्तपदे भरलेली नाहीत. आमचे सरकार आल्यावर ताबडतोब ही पदे भरून काढणार आहोत. भाजप सरकारने मोठा गाजावाजा करून मुद्रा कर्ज योजना आणली. वास्तविक आत्तापर्यंत ९१ टक्के तरुणांना केवळ २३ हजार रुपये कर्ज दिले गेले. या पैशांत ‘पकोडे तळायचा’ व्यवसायही करता येत नाही, अशी टीका संघवी यांनी केली.

टॅग्स :नरेंद्र मोदीमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019मुंबई